Asha Sevika Kaam Bandh Andolan News : शिंदे-फडणवीस सरकारला आशासेविकांचा काम बंदचा इशारा; जाणून घ्या कारण

या योजनांचा लाभ तळागाळातील व वाड्यावस्त्यांवरील सामान्य जनतेला होत आहे.
Solapur, Anganwadi Sevika
Solapur, Anganwadi Sevikasaam tv

Solapur News : काेराेना काळात (corona) ज्यांनी जिवावर उदार हाेऊन काम केले त्या आशासेविकांना गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या पगारापासून वंचित ठेवले गेले आहे. त्यामुळे निराश झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील आशासेविकांनी (asha sevika) येत्या एक जुनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. त्याबाबतचे निवेदन नुकतेच आशासेविकांनी प्रशासनास दिले आहे. (Maharashtra News)

Solapur, Anganwadi Sevika
Ulhasnagar Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या; चाॅपर, तलावरीने हल्लेखाेरांनी पसरवली दहशत

सोलापूर (solapur) जिल्ह्यात ग्रामीण अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २७०० आशासेविका व १३६ गटप्रवर्तिका काम करत आहेत. आशा व गटप्रवर्तिका करत असलेल्या कामामुळे आज केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक मोहिमा यशस्वी होताना दिसत आहेत.

या योजनांचा लाभ तळागाळातील व वाड्यावस्त्यांवरील सामान्य जनतेला होत आहे. एकीकडे आशा व गटप्रवर्तक करत असलेल्या कामाचे शासनाकडून तोंड भरून कौतुक करून त्यांचा सन्मान केला जात आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तिकांना केलेल्या कामाचा वेळेवर मोबदला दिला जात नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

Solapur, Anganwadi Sevika
Gautami Patil Rapchik Dance : पाटलांचा बैलगाडा...सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम..., गाैतमीच्या रापचीक डान्सनं तरुणाई घायाळ

सद्यस्थितीत पाच महिन्यांपासून राज्य व केंद्र शासनाचा मोबदला न मिळाल्याने आशा व गटप्रवर्तिकांना उसनवारी करून घरखर्च भागवावा लागत आहे. त्यामुळे त्यांची हि हालाखीची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांचा सर्व थकित मोबदला त्वरित देण्यात यावा. अन्यथा एक जून पासून जिल्ह्यातील सर्व आशासेविका व गटप्रवर्तिका बेमुदत काम बंद आंदोलन व धरणे आंदोलन करणार आहाेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com