Satara News Saam tv
महाराष्ट्र

Jaykumar Gore News : लोकसभा निवडणुकीत काय केले हे सर्वश्रुत; आमदार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण यांच्यावर निशाणा

Satara News : साताऱ्याच्या दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला.

ओंकार कदम

सातारा : रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं; हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काय केलं; हे सर्व जनतेला माहित आहे; अशा शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. 

साताऱ्याच्या (Satara News) दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास २० हजाराहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी (Jaykumar Gore) आमदार जयकुमार गोरे यांनी बोलत असताना रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. 

या वेळी बोलताना आमदार गोरे म्हणाले, कि तीन पक्षाची आपली युती आहे. या युतीने अजूनपर्यंत कोणताही उमेदवार जाहीर केला नाही. अजित पवार यांनी फलटणमधील विधानसभेचा उमेदवार कसा जाहीर केला? याबाबत मला माहिती नाही. आमदार दीपक चव्हाण हे अजित पवार गटातून उभे राहतील की नाही याबाबत मला शंका आहे. लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघात जो भाजपचा पराभव झाला त्यामध्ये ज्या ज्या लोकांचा हात आहे; ते युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT