Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक समाजाची सरकारकडून फसवणूक; जरांगे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

Satara News : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टला पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्यात आले असून मनोज जरांगे पाटील हे यासाठी ठिकठिकाणी जाऊन समाज बांधवाना आवाहन करत आहेत

ओंकार कदम

सातारा : मराठा समाजाने आजपर्यंत अनेक आंदोलन हे शांततेच्या मार्गाने केले आहेत. याचा फायदा हे सरकार घेत असल्याचा आरोप करत सरकारने आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक समाजाची फसवणूक केली असल्याने आता माघार घ्यायची नाही, असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.

मराठा समाजाच्या माध्यमातून २९ ऑगस्टला चलो मुंबईचा नारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज फलटण येथे आले होते. फलटण येथे सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस तुमच्या पोरांना औषध देऊन मारायचं म्हणत असल्याचा गंभीर आरोप मनोज जारंगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लावला.

आता माघार नाहीच 

दरम्यान २९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून देखील प्रत्येक घरातील मराठा बांधव या मोर्चासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी देताना आजपर्यंत या सरकारने आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक समाजाची फसवणूक केली असल्याने आता माघार घ्यायची नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले अजित पवार एकतर मुंडेंना मंत्रीपद देत नसतात  आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाहीत. जर दिले तर लई होईल हे बेरजेच्या बाहेर जाईल; असा इशारा त्यांनी दिला. मराठ्याच्या वाटेला गेला तर आता सोडत नाही असे सांगत आता आरक्षण ओबीसीतूनच घेणार देवेंद्र फडवणीस यांना काय करायचे ते करू दे; अशा शब्दात इशारा देखील त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT