Akola Police : दहशत माजविणाऱ्यांची उतरविली मस्ती; पोलिसांनी शहरातून काढली धिंड

Akola News : अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारे या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा 'रोड शो' होताय.. त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला
Akola Police
Akola PoliceSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : दादागिरी करत शहरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. नाहक त्रास देत दादागिरी केली जात असते. अशाच प्रकारे अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची मस्ती जिरवली आहे. शहरातून त्याची धिंड काढत कान पकडून सर्वांना माफी मागायला लावली. यामुळे दादागिरी करणाऱ्यांना अकोला पोलिसांनी एक प्रकारे दणका दिला आहे. 

अकोला शहरात हा प्रकार घडला होता. परिसरात दहशत निर्माण व्हावी, तसेच आपि दादागिरी दिसून यावी यासाठी तापडिया नगरात एका तरुणाचा कहर पहायला मिळाला होता. कल्लू तिवारी असं या तरुणाचे नाव असून त्याने फावड्याने मारहाण करीत परिसरातील ३ ते ४ दुकानाची तोडफोड केली होती. इतकेच नाही तर दुकानांची तोडफोड करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल केले होते.

Akola Police
Akola : ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; गावकऱ्यांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा

नेमकं काय घडलं
तापडिया नगरात मोहन भाजी भंडार चौकात एका नशेखोर तरुणाने रस्त्यावर गोंधळ घातला होता. परिसरातील दुकानात तोडफोड केली होती. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होत. घटनेदरम्यान काही दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद करून पळ काढला होता. तर काहींनी धैर्य दाखवून पुढे येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोंधळ घालणाऱ्या वीरेंद्र उर्फ कल्लु तिवारी नामक तरुणाला अटक केली होती.

Akola Police
Taloda News : बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; तळोदा तालुक्यात तीन लाखांचे बोगस खत जप्त

पोलिसांनी ताब्यात घेत काढली धिंड 

सदरचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता अकोला पोलिसांकडून या गावगुंडाना ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांचा रोड- शो करत त्यांची शहरातील काही भागात धिंड काढण्यात आली आहे. दरम्यान दुकानांची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल होतं. त्याच ठिकाणी पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कल्लू तिवारीची धिंड काढायला सुरुवात केली. तसेच त्याला परिसरात माफी देखील मागायला लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com