Satara Doctor Case update Saam tv
महाराष्ट्र

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Phaltan Doctor Case Update: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण आले आहे. पोलिसांनी दुपारी सील केलेल्या डॉक्टरच्या मोबाइलवरील व्हॉट्सॲपचा लास्ट सीन रात्रीचा कसा? असा खळबळजनक दावा कुटुंबीयांनी कला आहे.

Priya More

Summary -

  • साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

  • डॉक्टरच्या कुटुंबीयांनी मोबाईल सील झाल्यानंतर तो वापरल्याचा संशय व्यक्त केला

  • आरोपींनी फिंगर लॉक वापरून पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप

  • पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

साताऱ्याच्या फलटण शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी खळबळजनक आरोप केला आहे. डॉक्टरच्या कुटुंबीयांनी अनेक संशय व्यक्त केले आहेत. अद्याप आम्हाला पीएम रिपोर्ट मिळाला नाहीत. त्याचसोबत तिचा मोबाइल ३ वाजेपर्यंत सील करण्यात आला होता मग व्हॉट्सअपचे लास्ट सीन रात्रीचे का दाखवत आहे? याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.

आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या कुटुंबीयांची सोमवारी बीडमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिस तपासाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. डॉक्टरच्या आतेभावाने सांगितले की, डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिचा मोबाईल सील करण्यात आला असे आम्हाला पोलिसांकडून सांगण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो होतो. पोलिसांनी मोबाईल सील केला असे सांगितले. पण आम्ही जेव्हा तिचे व्हॉट्सॲपचा लास्ट सीन चेक केला तेव्हा तो आम्हाला ११ वाजून १३ मिनिटं असल्याचे दिसून आले. याचा अर्थ मधल्या काळात तिचा मोबाइल कुणी चालू केला का? मोबाइल सील कधी केला? याचे काहीच पुरावे आमच्याकडे नाहीत.'

डॉक्टरच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. त्यांनी असे देखील सांगितले की, 'आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही तिची हत्या झाली आहे. आरोपीने सर्व पुरावे नष्ट केले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे सरेंडर केले. त्याचसोबत पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृत डॉक्टरच्या फिंगर लॉकचा वापर केला आणि मोबाइल उघडला. त्यानंतर महत्वाचा डाटा, घटनेसंबंधित पुरावे डिलीट केले.', असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, साताऱ्याच्या फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारीने फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये तिने पीआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप केले. त्यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्याचसोबत ४ वेळा बलात्कार केल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी बदने आणि बनकर या दोघांना अटक केली. सध्या पोलिस दोघांची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasgulla Recipe: संध्याकाळी स्विट डिश खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल रसगुल्ला

Mobile Phone Uses: तुम्हीही सतत मोबाईल फोन पाहताय? जडू शकतात गंभीर आजार

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, आर्थिक लूट करणारी आंतरराष्ट्रीय टोळीला अटक

Chris Broad On BCCI: मला एक फोन आला अन्...ICC च्या मॅच रेफरीचे बीसीसीआयवर गंभीर आरोप, सौरव गांगुलीही वादाच्या भोवऱ्यात

Lip Care: थंडी पडताच ओठ काळे होतात; 'हे' घरगुती उपाय तुम्हाला देतील सॉफ्ट पिंक लिप

SCROLL FOR NEXT