Satara Doctor Case : महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे गटाची उडी; CM फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
सुषमा अंधारे यांनी आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचा व्हिडिओ दाखवून प्रकरण उचलून धरलंय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया
या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपमध्ये वाद पेटला
साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. सुषमा अंधारे यांनी एका दाम्पत्याचा आत्महत्या करण्याआधीचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओवरून अंधारे यांनी सत्ताधारी नेत्यावर आरोप केला. अंधारे यांच्या आरोपावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून राजकारण करणं दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा डॉक्टर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणात काही आरोप केले जातात. ज्यांना या गोष्टीची माहिती नाही, तेही लोक आरोप करत आहेत. अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणारे दुर्दैवी लोक आहेत. कारण त्यांना लाइमलाइटमध्ये राहायचं आहे. मात्र, त्यासाठी आमच्या गरीब डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं भांडवल का करतात? त्यात कोणालाही सोडलं जाणार नाही. सर्व आरोपींवर कारवाई होणार. चूक कोणाचीही असू द्या. त्यांच्यावर कारवाई होणार'.
आगामी निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. हे कव्हर फायरिंग आहे. त्यांना हे माहीत आहे की, या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. कव्हर फायरिंगसाठी मतदारयादीसाठी चुकीचा संदेश पसरवत आहेत. मतदारयाद्यांच्या संदर्भात आम्ही वारंवार भूमिका मांडली आहे. दुबार मतदारांबाबतही भूमिका मांडली आहे. दोन ठिकाणी मतदान झाल्याचे दाखवलं, तर ते आरोप सत्य ठरतील. असे ते कुठेही दाखवू शकत नाही'.
'तुम्हाला संधी मिळते, त्यावेळी आक्षेप घेत नाही. आक्षेप घेतल्याशिवाय मतदारयादीतील नावे कमी होऊ शकत नाही. तुम्ही तेव्हा भूमिका घेत नाही. फक्त माध्यमांसमोर येऊ बोलतात. तुम्ही त्याबाबत गंभीर नाहीत. त्यांना फक्त कव्हर फायरिंग करायची आहे. या संदर्भात निवणूक आयोगाच्या निर्णयालाही त्यांनी विरोध केला, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

