Satara Crime Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime : कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावले; साताऱ्यात भररस्त्यावरील घटनेने खळबळ

Satara News : मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्त्यावर अडवत थेट कोयता काढून मानेला लावला, यानंतर गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार झाले आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

ओंकार कदम

सातारा : रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्या जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र भररस्त्यावर महिलेला गाठत कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात प्रतापसिंह नगर परिसरात सकाळच्या सुमारास घडली आहे. यात भयभीत झालेल्या महिलांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करत पळ काढला. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

सातारा शहरातील प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मोनी पार्क येथे सदरची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमानी कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी लूट केली आहे. 

मानेवर कोयता ठेवत मंगळसूत्र तोडले 

मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेला रस्त्यावर अडवून कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडली. यावेळी जिव वाचविण्याच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरून फारशी वर्दळ नसल्याने मदतीला देखील कोणी आले नाही. 

जीव वाचविण्यासाठी गेटवरून उडी 

तीन महिला सोबत जात असताना अचानक घडलेल्या या प्रकाराने महिलांनी आरडाओरड करत पळ काढला होता. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. महिलांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

Dry fruits Ladoo: लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू; सोपी रेसिपी वाचा

Sev Recipe : दिवाळीला घरीच बनवा चटपटीत तिखट शेव, मार्केटपेक्षा चव भारी

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

SCROLL FOR NEXT