jitendra dudi satara collector, Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 saam tv
महाराष्ट्र

Satara News : पालखी मार्गावर मटण, मांस, मद्य विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिका-यांना केली.

Siddharth Latkar

Satara News : सातारा जिल्हा प्रशासनाने वारकरी (warkari) व भाविकांना (devotees) आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2023) निमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (jitendra dudi satara collector) यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पालखी मार्गावरील मटण, मांस, बिअर बार तसेच मद्य विक्रेते यांना व्यवसाय बंद ठेवण्याबाबतचे आदेश करावेत अशी सूचना अधिका-यांना केली आहे. (Maharashtra News)

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या 18 ते 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा नुकताच आढावा घेतला.

त्यानंतर जिल्हाधिकारी डूडी यांनी अधिका-यांना सूचना केल्या. ते म्हणाले, अद्याप मान्सुनला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत तसेच त्या स्त्रोतातून दिवसाकाठी किती टँकर भरले जाऊ शकतात तसेच पालखी मार्गाचे शेजारील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत का याची खात्री करावी.

पायी वारी (wari) करणाऱ्या वारकऱ्यांना पालखी तळ, विसावा, सुलभ शौचालय, हिरकणी कक्ष, गॅस सिलेंडर वाटप, पिण्याचे पाणी, स्नानगृह इत्यादीबाबत माहिती दर्शविणारा नकाशा ठिकठिकाणी लावावा यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही असेही डुडी यांनी स्पष्ट केले.

पालखी सोहळ्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व निवासी डॉक्टर यांच्या चोवीस तास कालावधीसाठी नेमणुका कराव्यात अशा सूचना करुन जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, पायी वारी सोहळ्यामध्ये पॅकबंद पाण्याच्या बॉटल विक्री करण्यात येते हे पाणी पिण्यायोग्य आहे अगर कसे याबाबत खातरजमा करावी यासाठी फिरत्या पथकांची नियुक्ती करावी.तसेच पालखी कालावधीत पालखी मार्गावर तसेच पालखी तळावर विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पालखी मार्गावरील (Ashadhi Wari 2023) मटण, मांस, बिअर बार तसेच मद्य विक्रेते यांना बंद ठेवण्याबाबत अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कार्यवाही करावी तसेच मार्गावर दर दोन किलाे मीटर अंतरावर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी डूडी यांनी केल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT