Shrirampur Bandh : अखेर कृती समितीने दिली येत्या शनिवारी श्रीरामपूर बंदची हाक; जाणून घ्या कारण

आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.
Shrirampur Bandh, Shridi News
Shrirampur Bandh, Shridi Newssaam tv

- सचिन बनसाेडे

Shirdi News : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे व्हावे अशी मागणी करत आज (गुरुवार) जिल्हा कृती समितीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे करावे या मागणीसाठी येत्या शनिवारी (ता. 17) श्रीरामपूर बंदची (shrirampur bandh) हाक जिल्हा कृती समितीने दिली. (Maharashtra News)

Shrirampur Bandh, Shridi News
School Reopen : ए आई मला शाळेत जाऊ दे... नाशकात पालकांचा मुलांसह शाळेच्या बाहेर ठिय्या, निरागस बालकांनी रस्त्यावरच बसून खाल्ला टिफिन

नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा ही अनेक वर्षांपासूनची तेथील नागरिकांची मागणी आहे. मात्र राज्य सरकारने नुकतेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्या मतदारसंघातील शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. हे कार्यालय शिर्डी येथे होणार असल्याने भविष्यात जिल्हा विभाजन झाल्यास शिर्डी हेच जिल्ह्याचे ठिकाण होईल अशा चर्चा सुरू झाली आहे.

Shrirampur Bandh, Shridi News
Archery World Cup : जागतिक तिरंदाजी स्पर्धा : मराठमाेळ्या आदिती स्वामीचा विश्वविक्रम, 16 व्या वर्षी घडविला इतिहास

राज्य सरकारच्या या निर्णयाचा श्रीरामपूर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध केला असून सरकारच्या निर्णया विरोधात जोरदार घोषणाबाजी. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने शिर्डीत होऊ घातलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध केला. सुभाष त्रिभुवन (सदस्य, स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती) म्हणाले भविष्यात नागरिकांना अडचणी भासू नये यासाठी शिर्डीतील कार्यालय श्रीरामपूर येथे झाले पाहिजे.

Shrirampur Bandh, Shridi News
New Babies Born : तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबियांत हर्षाेल्लास; आईसह तान्हुले ठणठणीत

दरम्यान श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासह शिर्डीला मंजूर झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे करावे या मागणीसाठी आज जिल्हा कृती समितीने प्रान्त कार्यालयासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथेच व्हावे यासाठी येत्या शनिवारी श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com