Satara News : कोलंबिया येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी (स्टेज थ्री) स्पर्धेत भारताच्या आदिती गाेपीचंद स्वामी (archer aditi swami) हिने 711 गुणांकन प्राप्त करुन 18 वर्षाखालील गटात विश्वविक्रम स्थापित केला. आदितीच्या या यशानंतर सातारकर क्रीडाप्रेमींनी फटाके फाेडून जल्लाेष केला. (Maharashtra News)
कोलंबिया येथे ह्युंदाई तिरंदाजी विश्वकरंडकाच्या (Hyundai Archery World Cup) तिसऱ्या टप्प्यात अव्वल स्थान मिळविताना आदिती स्वामी हिने १८ वर्षांखालीलचा विश्वविक्रम मोडला. अवघ्या 16 व्या वर्षी आदितीने हे यश मिळविले आहे. तिने कंपाऊंड क्रीडा प्रकारात महिला गटात 711 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. हे यश मिळविताना आदितीने ज्योती सुरेखा वेन्नम (Jyothi Surekha Vennam) आणि सारा लोपेझ (Sara Lopez) यांना पिछाडीवर टाकलं.
या यशानंतर आदिती खूप आनंदित हाेती. इतके स्कोअरींग हाेईल अशी अपेक्षा नव्हती परंतु या स्कोअरमुळे मी खूप खूष आहे कारण मी केवळ 16 वर्षांची आहे असे तिने म्हटलं. भारताने (स्वामी, वेन्नम आणि परनीत कौर) कंपाऊंड महिला सांघिक स्पर्धेत 2119 गुणांसह अव्वल स्थान पटकावले, कोरियाने गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये केलेल्या जागतिक विक्रमापेक्षा फक्त एक गुण कमी असल्याचे गुणतक्ता स्पष्ट करीत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.