Santosh Deshmukh Case Saam tv
महाराष्ट्र

Beed: "आम्ही सरपंचाला उद्या उचलतो..", संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी 'डर्टी प्लॅन', घुले अन् चाटेच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं?

Santosh Deshmukh False physical Assault Accusations: संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लान रचण्यात आला होता, अशी माहिती गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबातून समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, अशी धक्कादायक माहिती गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबातून समोर आली आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यात प्लान शिजला असल्याची माहितीही साक्षीदाराने दिली आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका महिलेच्या प्रकरणात देशमुख यांना अडकवण्याचा कट रचला होता. बीडच्या नांदूर फाट्यावर ८ डिसेंबर रोजी झालेल्या पार्टीत हा कट शिजला होता. त्यादिवशी विष्णू चाटे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये सगळे जमले होते. पार्टीमध्ये देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचण्यात आला होता.

पार्टीत घडलेला संवाद

जेवताना विष्णू चाटे हा सुदर्शन घुलेला वादावरून टोमणे देत होता. वॉचमनला का मारले? "आम्ही कमवायचं आणि तुम्ही गमवायचं?" असे विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला. यावर सुदर्शन घुले म्हणाला, "आम्ही सरपंचाला उद्या उचलतो आणि त्याच्यावर ३७५ (बलात्कार)चा गुन्हा नोंदवतो". त्यावर विष्णू चाटे "तुला काय करायचं आहे ते कर, नाहीतर गावाकडे येऊ नकोस". असे घुलेला चाटेने धमकी दिली.

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी महिलेचा वापर

गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांना बदनाम करण्यासाठी एका महिलेची निवड करण्यात आली होती. ही महिला कळंब येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कळंब परिसरात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, हीच ती महिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हत्या झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह कोणत्या दिशेने नेले?

साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह केजच्या दिशेने नेण्याऐवजी कळंबकडे वळवला होता. असा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT