Pune News: शाळेत आला मुलाशी गप्पा मारल्या, अपहरण करण्याच्या प्रयत्न केला पण...; घटना CCTV मध्ये कैद

School kidnapping Pabal Pune News: गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या असतानाच पाबळ येथील श्री पद्मामणी जैन इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune
PuneSaam
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना पाबळ येथील एका इंग्रजी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने ड्रायव्हरला भेटण्याच्या बहाण्याने शाळेतील एका मुलाची सखोल चौकशी केली. तसेच त्याला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ड्रायव्हरने 'तुम्हाला ऑफिसमधून संमती घ्यावा लागेल', असे सांगताच त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. पालकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

२८ मार्च २०२५ रोजी एका अनोळख्या व्यक्तीने पाबळ येथील श्री पद्मामणी जैन इंग्लिश शाळेच्या आवारात प्रवेश केला. ड्रायव्हरला भेटण्याच्या बहाण्याने कुमार स्वरूप डफळ या विद्यार्थ्याची चौकशी केली. तसेच, त्याला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ड्रायव्हरने त्याला 'तुम्हाला ऑफिसमधून संमती घ्यावी लागेल', असे सांगितले. असे ड्रायव्हरने सांगताच त्या अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला.

Pune
Nirmala Navale: पुण्यातील महिला सरपंचावर महाराष्ट्र फिदा; मनमोहक PHOTO पाहिलेत का?

यानंतर याची माहिती मुलाच्या पालकांना मिळाली. त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

Pune
Jalgaon News: 'ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या', लाच घेताना वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांनी अधिक सर्तक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षा कडक करण्याची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com