
एका वाहतूक पोलिसाचा ट्रक चालकाकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संबंधित वाहतूक पोलिस कर्मचारी ट्रकच्या चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा वाहतूक पोलीस कर्मचारी पाचोरा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
जळगावच्या पाचोरा येथील एका वाहतूक पोलिसाचा ट्रक चालकाकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलील कर्मचारी आधी ट्रक चालकाला थांबवत आहे. नंतर ट्रकचालक वाहतूक पोलिसाला या ट्रकमध्ये केळी असल्याचे सांगत आहे. नंतर वाहतूक पोलीस त्याला १०० रूपये काढ असे म्हणत आहे.
त्यानंतर चालक 'ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या' असं अहिराणी भाषेत म्हणत आहे. त्यानंतर वाहतूक पोलीस ५० नाही, १०० द्या, असे म्हणत आहे. वाहतूक पोलीस चालकाकडून पैसे घेऊन पुढे जातो. याचा व्हिडिओ ट्रक चालकाने काढला आणि सोशल मीडियात शेअर केला. हा कर्मचारी पाचोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वाहतूक पोलिसाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.