Sarpanch, Gram Sevak Strike  Saam Digital
महाराष्ट्र

Sarpanch, Gram Sevak Strike : 3 दिवस गावगाडा ठप्प, राज्यातील सरपंच,ग्रामसेवकांचं कामबंद, 28 हजार ग्रामपंचायतींना टाळे

Sarpanch, Gram Sevak Strike News : राज्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचा-यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केलंय.. तसंच 28 ऑगस्टला ते मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलनही करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

तन्मय टील्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

राज्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचा-यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केलंय.. तसंच 28 ऑगस्टला ते मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलनही करणार आहेत. सन्मानजनक मानधनासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना आणि पीकविमा अर्ज भरण्याचं काम थांबणार आहे... पाहूया एक रिपोर्ट....

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 3 दिवसीय 'काम बंद' आंदोलन सुरू केलंय.. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन तसंच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्यासाठी संप सुरू केलाय.. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायतीचे कामबंद ठेवण्यात आल्याने गावगाडा ठप्प होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत पाहूया....

काय आहेत मागण्या?

सरपंचांना 15 हजार, उपसरपंचाला 10 हजार, ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार मानधन द्यावं

ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे

मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी

ग्रामसेवक आणि ग्रामविकासअधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी

ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करावी

ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा

काय होणार परिणाम? HEAD

लाडकी बहिण, पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम

शैक्षणिक कागदपत्रे, दाखले मिळणार नाहीत

महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या योजनांचे काम होणार नाही

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण गावगाडाच ठप्प झालाय. या आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना आणि पीकविमा अर्ज भरण्याचं काम थांबणार आहे... पाणी सोडण्यापासून, स्वच्छतेपर्यंत नित्याची कामही ठप्प झालीत...28 ऑगस्टला आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात धरणं आंदोलनही करणार आहेत..त्यामुळे गावगाड्याचं अर्थकारण ठप्प झालंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Singham Again Collection Day 16: 'सिंघम अगेन'ची धमाकेदार एन्ट्री, १६ व्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, कलेक्शन किती झालं?

SCROLL FOR NEXT