Maharashtra Assembly Election : 'करवीर'वरून महायुतीत जुंपली; विनय कोरे, चंद्रदीप नरकेनेंही ठोकला शड्डू

Karvir Vidhan Sabha/Mahayuti : कोल्हापूरमधील करवीर विधासभा मतदारसंघात विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने उमदेवार घोषीत केला आहे. आज शिंदेगटाच्या चंद्रदीप नरके यांनी कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSaam Digital
Published On

जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित करत असतील तर पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. जनसुराज्य पक्ष महायुतीतील घटक पक्ष अससू कालच विनय कोरे यांनी करवीरमध्ये पक्षाचा उमेदवार जारीर केला. त्यामुळे कागल पाठोपाठ करवीर विधासभा मतदारसंघातही महायुतीत तेढ निर्माण झालं आहे.

Maharashtra Assembly Election
Jammu Kashmir Election Date : मोठी बातमी! जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षानंतर निवडणुका, ३ टप्प्यात मतदान, ४ ऑक्टोबरला मतमोजणी!

कालच विनय कोरे यांनी करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मेळावा घेऊन आपला उमेदवार जाहीर केला. शिवाय करवीरचा आमदार हा जनस्वराज्य पक्षाचाच असेल असा इरादा बोलून दाखवला. यावर बोलताना चंद्रदीप नरके यांनी मी करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे. मात्र शाहुवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील शिवसेनेकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. असं वक्तव्य चंद्रादीप नरके यांनी केलं आहे.

त्यामुळे आता कागल पाठोपाठ करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील महायुतीत तेढ निर्माण झालं आहे. 20 ऑगस्ट रोजी महायुतीचे प्रमुख तिन्ही पक्षांचे नेते कोल्हापूरमध्ये येणार आहेत. या पेच प्रसंगावर कशा पद्धतीने तोडगा काढला जातो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीतील छोटे घटक पक्ष आपापली उमेदवारी घोषित करत आहेत. ही मोठी अडचण महायुती समोर राहणार आहे.

Maharashtra Assembly Election
Menstrual Leave : मासिक पाळीत नोकरदार महिलांना मिळणार सुट्टी; स्वातंत्र्यदिनी 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत असं म्हणत तुमचं पाठबळ मला अपेक्षित आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे, असं म्हणत विनय कोरे यांनी करवीरमधून संताजी बाबा घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. संताजी बाबा घोरपडे यांनी कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे. मी एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे अस सांगत आता कोणी तरी येईल, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर क वर्षाने तुम्ही आला आहात. मात्र महविकास आघडी सरकार पाडण्यासाठी जो संघर्ष केला त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जनसुराज्य पक्ष आघाडीवर होता, असं म्हणत त्यांनी चंद्रदीप नरके यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चंद्रदीप नरके यांनी कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election: तयारीला लागा! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून महत्वाची अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com