जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. यावरून विरोधकांच्या टीकेचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (NSG) महासंचालक नलिन प्रभात यांची AGMUT कॅडरमध्ये बदली केली होती. त्यानंतर अवघ्या १२ तासात त्यांच्यावर जम्मू आणि काश्मीरच्या विशेष पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑक्टोबरपासून ते पदभार स्वीकारणार आहेत.
AGMUT म्हणजे अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश कॅडर आहे, ज्याचे नियंत्रण गृह मंत्रालय करते. आंध्र प्रदेश कॅडरचे 1992 च्या बॅचचे IPS अधिकारी नलिन प्रभात, 1991 च्या बॅचचे अधिकारी आर. आर. स्वैन यांची जागा घेणार आहेत. ते 30 सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. गृह मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. नलिन प्रभात यांना जम्मू आणि काश्मीरच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी स्वैन निवृत्त झाल्यावर ते पदाचा कार्यभार स्वीकारतील, असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.
नलिन प्रभात यांनी जम्मू काश्मीरमध्ये बारा वर्षांहून अधिक काळ विविध पदांवर काम केलं आहे. त्यांना दहशतवादविरोधी ग्रिड ऑपरेशन्सची चांगली माहिती आहे, असंही गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. आज जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याची आचासंहिता लागण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्थेत हा मोठा बदल केला आहे.
त्यांनी याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त DG आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये CRPF चे महानिरीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशातील सुरक्षा गतिमानतेची सखोल माहिती आहे. त्यांच्या विशिष्ठ सेवेमुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ज्यात तीन शौर्य पदक (तीन वेळा), पराक्रम पद्म आणि गुणवंत आणि विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.
नलिन प्रभात यांचा जन्म 14 मार्च 1968 रोजी हिमाचल प्रदेशातील मनाली, थुंग्री गावात झाला आहे. नलिन प्रभात हे सेंट स्टीफन कॉलेज दिल्लीचे बीए (ऑनर्स) आणि एमएचे माजी विद्यार्थी आहेत. शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी आणि आंध्र प्रदेश आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.