Saptashrungi Devi Saam TV
महाराष्ट्र

Saptashrungi Devi : नवरात्रौत्सवात सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार, प्रशासनाचा निर्णय

Shardiya Navratri 2023: १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे.

अभिजीत सोनावणे

Saptashrungi Devi Mandir News :

नवरात्रोत्सव काळात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त वणी येथे दाखल होतात. भाविकांचा मोठी गर्दी या नऊ असते. सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

नवरात्रौत्सव काळात सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. (Latest Marathi News)

नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहेत. (Nashik News)

नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या लाखोमंध्ये असते. त्यामुळे एकाचवेळी अनेक भाविक याठिकाणी जमतात. अशावेळी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दर्शनाला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी २ स्वतंत्र मार्गांच नियोजन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

SCROLL FOR NEXT