Chanakya Niti On Women : नीतीशास्त्रानुसार या महिला असतात कुटुंबासाठी 'लकी चार्म', लक्ष्मी घरात नांदते

Women's Behaviour : जिथे सद्गुणी स्त्री असते तिथे सुख-समृद्धीची कधीच कमतरता नसते.
Chanakya Niti On Women
Chanakya Niti On Women Saam Tv
Published On

Chanakya Niti :

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या कुटुंबात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहावी. घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये आणि कुटुंबात संपत्ती असावी. आचार्य चाणक्य मानतात की हे मुख्यत्वे स्त्रियांवर अवलंबून आहे. जिथे सद्गुणी स्त्री असते तिथे सुख-समृद्धीची कधीच कमतरता नसते. चला तर मग जाणून घेऊया महिलांचे कोणते गुण कुटुंबासाठी (Family) शुभ मानले जातात.

Chanakya Niti On Women
Chanakya Niti On Home : घर घेताना या 5 गोष्टींवर विशेष लक्ष द्या, जाणून घ्या सर्वकाही

वेळोवेळी रडणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्या महिला प्रत्येक समस्येवर रडू लागतात त्यांचे हृदय खूप कोमल असते. अशा महिलांना (Women) पती आणि कुटुंबापासून दूर राहायचे नसते. अशा महिलांचे मन, स्वभाव खूप चांगले असतात आणि त्या कधीही कोणाचेही मन तोडूत दुखावत नाही.

धार्मिक कार्यात रस

आचार्य चाणक्य मानतात की ज्या महिलांना धार्मिक कार्यात रस असतो. त्यांचे मन शांत असते आणि अशा महिला प्रगती किंवा यश मिळविण्यासाठी एकाग्र राहतात. अशा स्त्रिया फक्त त्यांच्या स्वतःच्या ध्येयात मग्न असतात आणि इतरांच्या यश किंवा अपयशाने त्यांना त्रास होत नाही.

शिस्तबद्ध असणे

नीतीशास्त्रात आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की ज्या महिला शिस्तबद्ध राहतात त्यांना लवकर यश मिळते. अशा स्थितीत महिला इतरांसाठी प्रेरणादायी असतात. अशा महिलांना कुटुंबासह समाजातही सन्मान मिळतो.

Chanakya Niti On Women
Chanakya Niti On Students : विद्यार्थ्यांनी या गोष्टी अंगिकारल्या तर करिअरमध्ये मिळेल नक्कीच यश, जाणून घ्या

कोणाचाही द्वेष करू नका

आचार्य चाणक्य चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की ज्या स्त्रिया प्रत्येक समस्येवर रडतात आणि ओरडतात त्यांच्यामध्ये तणाव आणि राग नसतो. अशा महिलांना ना कुणाबद्दल द्वेष असतो ना कुणाशी वैर असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com