Santosh Deshmukh Case  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी, उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद; कोर्टात काय-काय घडलं?

Ujwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी आज बीडच्या मकोका न्यायालयात पार पडली. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिलाच युक्तीवाद केला. आजच्या सुनावणीदरम्यान काय-काय झालं वाचा सविस्तर....

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हजेरी लावत त्यांनी न्यायालयासमोर हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तर आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके हे देखील न्यायालयात हजर होते. या सुनावणीवेळी उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्याकांडाशी कसा संबंध आहे हे न्यायालयाला सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबीयांचे वकील पत्र न्यायालयासमोर सादर केले. १२ मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलाने चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट मागितले होते. आजच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि चार्जशीटमधील जबाबाची मागणी केली. या सुनावणीदरम्यान उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील या प्रकरणासंदर्भातील सर्व डॉक्युमेंट न्यायालयापुढे सादर केले. उज्वल निकम यांनी या सुनावणीदरम्यान युक्तीवाद करताना सुदर्शन घुले गँगचा लीडर आहे का? वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून खंडणी मागितली? असे प्रश्न उपस्थित केले.

वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत. आवाज ओळखण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये २९ नोव्हेंबरला बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते. ८ डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदूर फाटा येथे देखील बैठक झाली. या बैठकीला आरोपी विष्णू, सुदर्शन घुले उपस्थित होते. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा झाली. विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये चर्चा होत असताना त्याला कायमचा धडा शिकवणे गरजेचे आहे असे विष्णू चाटे म्हणाला होता.' असे उज्ज्वल निकम यांनी न्यायालायासमोर सांगितले.

त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. हा युक्तिवाद जवळपास अर्धा तास चालला. या सुनावणीदरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपपत्र आरोपींच्या वकिलांना देण्यात आले. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेमसाठी तयार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT