Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: विष्णू चाटे आणखी अडकला; पुरावा नष्ट केल्यानं कलम वाढवले

Vishnu Chate: संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच आवादा कंपनीत खंडणी मागितल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विष्णू चाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम वाढवण्यात आले आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटेच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. विष्णू चाटेने अद्याप पोलिसांना मोबाईल दिला नाही. हा मोबाईल त्याने नाशिकमध्ये फेकला असल्याचे सांगितले होते. पण पोलिसांना अद्याप तो सापडला नाही. त्यामुळे विष्णू चाटेविरोधात पुरावा नष्ट केल्याप्ररणी कलम वाढवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच आवादा कंपनीत खंडणी मागितल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विष्णू चाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. विष्णू चाटेकडील मोबाईल मिळून आला नसल्याने आता त्याच्याविरोधात पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात कलम वाढवण्यात आले आहे. केज पोलिसांनी या संदर्भाची कारवाई केली आहे.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी ५ मोबाईल जप्त केले होते हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले. पण विष्णू चाटेने अद्यापही सीआयडीला मोबाईल दिला नव्हता. फरार असताना हा मोबाईल त्याने नाशिकमध्ये फेकून दिला होता, तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी त्याने सांगितल्याप्रमाणे नाशिकमध्ये मोबाईल शोधला पण तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याविरोधातील कलम वाढवण्यात आले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच वाल्मिक कराडने खंडणीसाठी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलणं केलं होतं. याबाबत विष्णू चाटेने कबुली देखील दिली. तब्बल २ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण कृष्णा आंधळे अजूनही मोकाटच आहे. पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषीत केले असून त्याला शोधून देणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT