Santosh Deshmukh Case : कराड गँग सीसीटीव्हीत कैद, खंडणीच्या दिवशी सगळे आरोपी एकत्र; देशमुख हत्येचे धागेदोरे जुळणार?

Santosh Deshmukh Case Updates : सरपंच संतोष देशमुख हत्येतले सर्व आरोपी वाल्मिक कराडसोबत असल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. कराड या आरोपींसोबत काय करत होता? खंडणी मागितल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? पाहा परळी गँगवरचा हा विशेष रिपोर्ट.
Santosh deshmukh case cctv footage walmiki karad gang
Santosh deshmukh case cctv footage walmiki karad gangSaam Tv (Youtube)
Published On

Santosh Deshmukh Case Updates :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराडचं कनेक्शन आता उघड होण्याची शक्यता आहे. कारण कराडचा त्याच्या परळीतल्या गँगसोबतचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. आणि हा व्हिडिओ कराड गँविरोधातला सर्वात मोठा पुरावा मानता जातोय. कारण अवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशीच कराड आपल्या साथीदारांसोबत असल्याचं उघड झालंय. आरोपी विष्णू चाटे याच्या केजमधल्या ऑफिसमध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे.

यात वाल्मिक कराडसोबत हत्येतला आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतिक घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे. एवढंच नव्हे तर या आरोपींच्या गँगमध्ये निलंबित पीएसआय राजेश पाटीलही सोबत असल्याचं उघ़ड झालंय. त्यामुळे आता वाल्मिक कराडवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागलीय.

अवादा कंपनीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात दोन कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकी ही तक्रार काय होती ती पाहूयात.

कराडविरोधात आवादा कंपनीची तक्रार

आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी केलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरुन संजय शिंदेंना फोन आला होता. त्यावेळी वाल्मिक कराड शिंदेंशी फोनवरुन बोलला. सुदर्शन घुले सांगतो तसं कर नाहीतर हात-पाय तोडीन अशी धमकी वाल्मिक कराडने दिल्याचा संजय शिंदेंचा आरोप आहे.

Santosh deshmukh case cctv footage walmiki karad gang
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या मुलाला मोठा दिलासा, सोलापूरात गुन्हा दाखल करता येणार नाही; कोर्टाचे आदेश

आता याच दिवशी हत्येतील आरोपी आणि वाल्मिक कराडसोबत असल्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड सहभागी असल्याचा संशय बळावलाय. या सीसीटीव्ही फुटेजमुळे कराडच्या अडचणी तर वाढणारच मात्र या दिवसानंतर तो कोणत्या बड्या धेंडाच्याही संपर्कात होता का याचाही तपास होणं गरजेचं आहे.

Santosh deshmukh case cctv footage walmiki karad gang
Pune News : पुण्यात मेंदू व्हायरस, गुईलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रूग्ण, पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com