Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कुठे शिजला? सीआयडी तपासात धक्कादायक माहिती उघड

Santosh Deshmukh latest News : संतोष देशमुख यांच्या हत्येचा कटाबाबत मोठी माहिती हाती आली आहे. त्यांच्या हत्येचा कट एका हॉटेल शिजल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यानंतर हॉटेल चालकानेही प्रतिक्रिया दिली.
santosh deshmukh Latest news
santosh deshmukh caseSaam tv
Published On

बीड : मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. संतोष देशमुख प्रकरणाने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांकडून आरोपींवर कठोर कारवाईंची मागणी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. सीआयडीच्या पथकाकडूनही तपास सुरु आहे. याचदरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एका हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय व्यक्त केला आहे.

santosh deshmukh Latest news
Saif Ali Khan Stabbing Case: ६ तासांची सर्जरी, शुद्धीवर येताच सैफने डॉक्टरांना काय विचारलं? 'ते' दोन प्रश्न चर्चेत

संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय सीआयडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीआयडी अधिकाऱ्यांनी तिरंगा हॉटेलची तपासणी देखील केली आहे. यावेळी त्यांनी ८ डिसेंबरचा सीसीटीव्ही फुटेज मिळतो का? हे देखील पाहिलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये २० दिवसांचं रेकॉर्ड राहत असल्याची माहिती हाती आली. त्यांना आठ डिसेंबरचा कोणताही व्हिडिओ मिळाला नाही. यामुळे सीआयडीचे अधिकारी आल्या पाऊली परतले.

santosh deshmukh Latest news
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, CID मध्ये मोठा बदल; तपास अधिकारी बदलले

सीआयडीचे अधिकारी १३ जानेवारी रोजी हॉटेलला आले होते. त्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. हॉटेलची तपासणी केली. मात्र आठ तारखेचं सीसीटीव्ही त्यांना मिळालं नाही. त्यामुळे ते येथून निघून गेले. ज्यावेळेस आठ तारखेला या ठिकाणी आरोपी आले होते. त्यावेळेस मी त्यांना ओळखत नव्हतो, असं म्हणत तिरंगा हॉटेलच्या चालकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'आमच्या हॉटेलमध्ये अनेक ग्राहक येत असतात. सीआयडीचं पथक १३ तारखेला आलं होतं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. त्यांना दिल्यानंतर २० दिवसांचं फुटेज त्यात होतं. त्यात २४ तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग होतं. त्याआधीचं रेकॉर्डिंग त्यात नव्हतं, असे हॉटेल चालकाने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com