Santosh Deshmukh Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असल्याचे म्हटले आहे. आरोपपत्रात एकूण ८ आरोपींचा उल्लेख आहे.
पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्याआधी ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुले याच्यासह प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे इतर आरोपी जेवण करण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला वाल्मीक कराडचा निरोप दिला.
'जर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.. आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांपर्यंत जाऊ द्या', असा वाल्मीक कराडचा निरोप सुदर्शन घुलेने विष्णू चाटेला दिला होता. त्यानंतर संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती.
६ डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात आवादाच्या कंपनीजवळ वाद झाला. ७ डिसेंबरला सुदर्शन घुलेने कराडला फोन केला. वाल्मीक कराडने 'त्यावेळी जो उठेल आणि आपल्या आड येईल त्याला सोडायचे नाही' असे सुदर्शन घुलेला म्हटले होते, असा उल्लेख पोलिसांच्या आरोपपत्रात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.