Krushna Andhale Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार, कोर्टानेच दिले आदेश

Big Action Against Krushna Andhale: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कार्टाने दिले आहेत. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कृष्णाच्या नावावर ५ वाहने तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. ही सर्व संपत्ती आता जप्त होणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कार्टाने दिले आहेत. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ६५ दिवसांनंतरही तो फरार आहे. आता त्याच्या मुसक्या आवळ्यासाठी कोर्टाने पाऊल उचलले आहे. कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता. तसंच याबाबतची माहिती देखील सादर केली होती. यामध्ये कृष्ण आंधळे यांच्याकडे ५ विविध प्रकारची वाहने असून धारूर आणि केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला दोन वेळा फरार घोषित करण्यात आले आहे. तरी देखील तो अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सर्व आरोपी एकाच वाहनातून वाशीपर्यंत गेले. त्यानंतर ती कार त्याच ठिकाणी सोडून हे सर्व आरोपी फरार झाले होते. याप्रकरणातील इतर सर्व आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पण अद्याप कृष्णा आंधळे सापडला नाही. तो फरार असून ६५ दिवस उलटले तरी त्याचा तपास लागला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT