Santosh Deshmukh Case : सरपंच हत्त्येतला आणखीन एक सीसीटीव्ही समोर; जीव घेणारे, जीव वाचवण्यासाठी पळाले? | VIDEO

Santosh Deshmukh Case CCTV Footage : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलाय. आता या पुराव्याच्या मदतीनं त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार का? नेमका काय आहे हा पुरावा? कोणत्या आरोपींचा यात पर्दाफाश झालाय ? पाहूयात विशेष रिपोर्ट.
Santosh Deshmukh Case Updates
Santosh Deshmukh Case UpdatesSaam Tv
Published On

Santosh Deshmukh Case Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घूण हत्त्या करणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. याआधी देखील सरपंच हत्येप्रकरणाचे अनेक सीसीटिव्ही समोर आलेत.. पण या सीसीटीव्हीत तुम्हाला सरपंचाची निर्घृण हत्या करुन त्यांचा छिन्नविच्छिन मृतदेह केजच्या जंगल शिवारात फेकून हे मारेकरी पळतांना दिसतायत. त्यामुळे हा सीसीटीव्ही पुन्हा पाहा.

या सीसीटीव्हीत एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वेगात येतांना दिसतेय. या संपुर्ण हत्त्या प्रकरणात काळ्या स्कॉर्पिओचा वापर हा गॅग्स ऑफ परळीतील दहशतवादाची ग्वाही देतोय. धाराशीवच्या वाशी इथं वेगात आलेली स्कॉर्पिओ कचकन ब्रेक दाबून थांबते. आणि त्यातून एक एक करत सगळे ६ आरोपी बाहेर पडतायेत....जणू काहीही न केल्यासारखे इथून गाडी सोडून धूम ठोकतानाची ही दृष्य.

Santosh Deshmukh Case Updates
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची जीभ छाटणाऱ्याला ५ लाख; वादग्रस्त विधानावरून एन्फ्ल्यूएन्सरचीच वादग्रस्त घोषणा

या आरोपींसोबत गेल्या २ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे देखिल आहे. त्यामुळे या अटकेतील आरोपींना कृष्णा आंधळे कुठे आहे हे नक्कीच माहित असावं असा ही संशय व्यक्त होतोय. हत्या केल्यानंतर हे सगळे आरोपी एकत्रच मोकाट फिरत गॅग्स् ऑफ परळीची दहशत माजवत असल्याचं या दृष्यांमधून दिसतंय. त्यामुळे या हत्त्या प्रकऱणात या सीसीटीव्ही फुटेजची आरोपींना शिक्षा देण्यास मदत होणार का?

Santosh Deshmukh Case Updates
Ranveer Allahbadia : रणवीर अलाहबादियावर 'शक्तिमान' भडकला, म्हणाला, त्याचं तोंड काळं करा अन् गाढवावरुन फिरवा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com