Dhananjay Deshmukh
Dhananjay DeshmukhSaam Tv

Santosh Deshmukh Case : 'आंधळे' कारभार! CCTV फुटेज मिळाल्यानंतर धनंजय देशमुख यांना वेगळाच संशय

Dhananjay Deshmukh questions police investigation: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा अजून पोलिसांना चकमा देत फिरतोय, यातच सीसीटीव्ही फुटेजवरुन धनंजय देशमुख यांनी पोलिस तपासवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Published on

बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे. याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या सर्व तपासावर आज, मंगळवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

पत्रकारांना हे सीसीटीव्ही फुटेज सापडते. पण पोलिसांना ते का सापडत नाही? जर वेळेत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असते तर आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असती. अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे मोकाट आहे. तोच या फुटेजमध्ये पळताना स्पष्ट दिसत आहे आतापर्यंत पाच ते सहा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. पण ते पोलिसांनी वेळेत घेतले नाही. जर ते वेळेवर घेतले असते तर आरोपी कुठे पळून गेले आहेत याचा तपास लागला असता, असं सांगतानाच धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केला.

Dhananjay Deshmukh
Beed News: आता QR कोडद्वारे दाखल करा तक्रार, बीड पोलीस अधीक्षकांचा नवा उपक्रम

सीआयडी आणि एसआयटीचा तपास चांगला सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस यंत्रणा नेमका काय तपास करत आहे ते आमच्यासमोर मांडा, अशी मागणीही देशमुख यांनी केली.धनंजय देशमुख यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले. तपास नीट करण्याऐवजी प्रशासन आंदोलन दडपण्यावर अधिक भर देत आहे. आरोपी पोलिसांसमोरून पळून जात असतील तर त्यांना शोधणार कोण? कृष्णा आंधळे देखील सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असतानाही त्याला अटक झाली नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

Dhananjay Deshmukh
Namdev Shastri : महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात बीड पोलिसांत तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

मोबाईल कॉल डिटेल्स काढा आणि पहिल्या चार-पाच दिवसांत काय झाले याचा तपशील उघड करा. जर सुरुवातीचा तपास योग्य प्रकारे झाला असता तर आज सर्व आरोपी गजाआड असते आणि त्यांना शिक्षा झाली असती. मात्र काहींना मिळालेल्या अभयामुळे आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नव्याने करण्यात यावा, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com