Kangana Ranaut: कंगना राणौतला अटक होणार? कोर्टाने दिली शेवटची संधी, नेमकं प्रकरण काय?

Kangana Ranaut Vs Javed Akhtar: कंगना राणौत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये असते. पुन्हा एकदा कंगना तिच्या एका विवादामुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी हे प्रकरण कोर्टातील आहे.
Kangana Ranaut Vs Javed Akhtar
Kangana Ranaut Vs Javed AkhtarGoogle
Published On

Kangana Ranaut: जावेद अख्तर यांनी २०२० मध्ये कंगना राणौतविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. कंगनाने जावेद अख्तरवर बॉलीवूडमधील आपल्या ओळखीच्या जोरावर कंगनाला चित्रपटातून काढून टाकल्याचा आरोप केला तेव्हा हे प्रकरण चांगलेच गाजले. याला उत्तर म्हणून जावेद अख्तर यांनी कंगनाला मानहानीची नोटीस पाठवली आणि नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

एका बातमीनुसार, मंगळवारी मुंबईच्या वांद्रे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती, यामध्ये कंगना राणौतला हजर राहावे लागणार होते. पण, ती न्यायालयात गेली नाही. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयाला सांगितले की, कंगना संसदेशी संबंधित काही महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे ती या कोर्टात उपस्थित राहू शकली नाही.

Kangana Ranaut Vs Javed Akhtar
Santosh Juvekar : 'राजे एकटे आहेत'; 'छावा' चित्रपटातील प्रसंग सांगताना संतोष जुवेकर भावुक

जावेद अख्तर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

कंगना न्यायालयात न गेल्यामुळे जावेद अख्तर यांचे वकील जेके भारद्वाज यांनी कंगनाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटसाठी याचिका दाखल केली. या वॉरंटमध्ये कंगना ४० पेक्षा जास्त तारखांना न्यायालयात हजर राहिली नाही, असा त्यांचा आरोप होता. वकिलाने म्हटले की, कंगना जाणूनबुजून खटल्याला उशीर करत आहे आणि न्यायालयाचा अवमान करत आहे.

Kangana Ranaut Vs Javed Akhtar
Rashmika Mandanna: १८०० कोटी कमावणाऱ्या रश्मिकाच्या घरावर फॅन बनून केली इनकम टॅक्सने रेड; रिकाम्या हातानेच घेतली माघार

न्यायालयाने कंगनाच्या वकिलाला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर, दंडाधिकाऱ्यांनी कंगनाला शेवटची संधी दिली आणि पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. जर कंगना पुन्हा न्यायालयात गेली नाही तर कठोर कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये अजामीनपात्र वॉरंट देखील असू शकतो.

कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, यामध्ये तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय, आता ती एका तमिळ आणि हिंदी मानसशास्त्रीय चित्रपटात दिसणार आहे. पण, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com