Walmik Karad  saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, CID मध्ये मोठा बदल; तपास अधिकारी बदलले

Walmik Karad: वाल्मीक कराडविरोधात मकोका लागताच सीआयडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. किरण पाटील आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडविरोधात मकोका लागताच सीआयडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सीआयडीतील तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. मकोकामध्ये सुदर्शन घुले गँगचा प्रमुख तर वाल्मीक कराड गँगचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला आहे. यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लिडर दाखविले आहे, तर वाल्मीक कराड गँगचा सदस्य आहे. तसेच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आले आहेत.

हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते. आता त्यांच्या जागी अप्पर पोलिस अधीक्षक किरण पाटील या प्रकरणाचा तपास करणार आहेत. त्यामूळे सीआयडीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आता यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध सीआयडी घेत आहे. त्यामुळे आरोपींनी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT