Badlapur School Case Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Badlapur Case: 'बदलापूरचे आंदोलन राजकीय स्टंट, विरोधकांनी CM शिंदेंचा दावा खोडला, संजय राऊत, वडेट्टीवारांनी थेट पुरावे दाखवले!

Badlapur School Case Latest News: हे आंदोलन राजकीय प्रेरीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील बड्या नेत्यांनी केला. यावरुनच विरोधकांनी संताप व्यक्त केला असून आता थेट पुरावेच दाखवले आहेत.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २२ ऑगस्ट २०२४

बदलापूरमध्ये घडलेल्या दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर बदलापूरकरांचा आक्रोश पाहायला मिळाला. नागरिकांनी रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. मात्र हे आंदोलन राजकीय प्रेरीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील बड्या नेत्यांनी केला. यावरुनच विरोधकांनी संताप व्यक्त केला असून आता थेट पुरावेच दाखवले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी पुरावे दाखवले!

बदलापूरचे आंदोलन हे विरोधकांचे कारस्थान असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांच्या कारवाईची महत्वाची कागदपत्रे शेअर केली आहेत. शिंदे- फडणवीस- अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह, असे म्हणत त्यांनी हे ट्वीट केले आहे.

आंदोलक बदलापूरचेच

"बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते. यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊतही संतापले!

दरम्यान, यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही थेट गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "देवेंद्र फडणवीस जी, उघडा डोळे, बघा नीट! बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड एप्लीकेशन आहे. सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक भाडोत्री आणि बाहेरची आहेत! काय लायकीची माणसं आपल्या मंत्रीमंडळात आहेत," असा टोला त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT