Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: तुमचं हिंदुत्व व्यापारी; नमो नमो चालतं पण 'जय भवानी' नको.. संजय राऊत भाजपवर बरसले!

Sanjay Raut Press Conference: केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल गीतातून जय भवानी हा शब्द काढायला सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २२ एप्रिल २०२४

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल गीतातून जय भवानी हा शब्द काढायला सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बदल करणार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. त्याचबरोबर आता खासदार संजय राऊत यांनीही मोदी शहांवर घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची शाखा आहे. दिल्लीमधील निर्वाचित आयोजित आहे त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणे गरजेचे आहे. हर हर महादेव या घोषणा देत आहेत त्याला आतापर्यंत कोणी बंदी आणली नव्हती. काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव याला बंदी नाही आणि नव्हती, " असे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

तुमचं हिंदुत्व व्यापारी..

तसेच "तुमचं नमो नमो, घर घर मोदी चालतं. ते फडणवीस बोलतात तुम्हाला हिंदुत्वाचा नाव घेण्याचा अधिकार नाही. मगं तुम्हाला आहे का? शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा संबंध आहे त्याच्या आसपासही भाजप नाही. तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे" अशी टीकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही (Eknath Shinde) जोरदार हल्लाबोल केला. "एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले. भारतीय जनता पक्ष, इडी आणि सीबीआय त्यांना तुरुंगात टाकणार होते. भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्याला स्थान आहे," असे ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Women's health issues: धक्कादायक! ४०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त; केवळ लाजेमुळे उपचारास होतोय विलंब

SCROLL FOR NEXT