Maharashtra Live News Update: पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अन् जागावाटप, महापालिका निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

पुणे शहरात पुढचे पाच दिवस नाकाबंदीचे

दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहर पोलिसांकडून पुढील पाच दिवस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाणार

शहरात 31 डिसेंबरला रात्री वाहतूक नियमांची उल्लंघन होणार नाही या दृष्टीने आधीपासूनच कारवाई तीव्र वाढवण्याच्या सूचना

पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा उत्सव व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना

अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामतीत

देशातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असणार आहेत.गौतम अदानींच्या हस्ते बारामतीत निर्माण करण्यात शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स च उद्घाटन सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. यासाठी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांची उपस्थिती असणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

महापालिका सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले असून माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

खोपोली हत्या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्याकामी रायगड पोलिसांना यश

खोपोली हत्या प्रकरणी नऊ आरोपींना जेरबंद करण्याकामी रायगड पोलिसांना यश आले आहे. रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. रायगडच्या खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरदिवसा निघृणहत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी पोलिसांच्या हाती लागले असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे फरार आहेत. या घटनेचा CCTV फुटेज आता समोर आला असून यामुळे पुन्हा एकदा बिडच्या संतोष देशमुख हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे.

पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पुणे शहरातील 41 प्रभागांमध्ये असलेल्या 41 उमेदवारांचा प्रस्ताव दिला होता मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये ५०,५०,५० हा फॉर्म्युला आहे जिथे भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही तिथे आम्हाला स्थान दिलं जातं. महाविकास आघाडीच्या या खेळीला वंचित बहुजन आघाडी बळी पडणार नाही त्यामुळे सध्या तरी आमच्यात कुठलीही युती नाही असं स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी घेतली आहे

इंद्रायणी नदीवरिल कुंडमळा पुलाच्या कामाला अखेर मुहर्त, पूल पडल्याने चार पर्यटकांचा झाला होता मृत्यू 

मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे पंधरा जून रोजी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर सत्तावीस हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पुलाच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. त्या यादेशानुसार स्थानिक आमदार आणि खासदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आज अखेर कुंडमळा पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुलाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूल पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी १० ते १२ किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. आता नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुलभ होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही मोठी वाढ होणार आहे. पुलाचे काम सुरू होताच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आले आहे.

संकटे माणसाला घडवतात, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करायला शिकले पाहिजे - बानगुडे पाटील.

संकटांचे स्वागत करायला शिका, संकटे तुम्हाला घडवतात अनुकूल परिस्थिती तुमच्यातील गुण बाहेर पडतात तत्पर निर्णय घेणारी माणसेच यशस्वी होतात असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत ते बोलत होते. आपल्या मनातील सकारात्मक विचार हाच आपल्याला यशस्वी विषयावर घेऊन जातो. यशाचा धडा गिरवायला विचारांची पेरणी महत्त्वाची असते, ती पेरणी आत्ताच करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, एपीजे अब्दुल कलाम, यांनी परिस्थितीचा कधीच भाऊ केला नाही. त्यांनी परिस्थितीवर मात करून आयुष्याचं सोनं केलं. अशा मार्मिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांनी दिला.. यावेळी मावळे चे खासदार श्रीरंग बारणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास काकडे यास अनेक मान्यवर उपस्थित होते

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात तोबा गर्दी

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहे.. टायगर पॉईंट वरून लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य बघणे आणि येथील थंडगार हवेचा सुखद आनंद घेण्यासाठी टायगर पॉईंट वर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली आहे.. मुंबईसह राज्यातून आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनाने आल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र टायगर पॉईंट वर बघायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com