Sanjay Raut yandex
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे', संजय राऊतांची मागणी

Sanjay Rauit On PM Modi And Chandrachud: ज्या पद्धतीने या सरकारने आमदार फोडले, त्यांना अपात्र केलं पाहिजे पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नाही. चंद्रचूड यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे.

Dhanshri Shintre

नरेंद्र मोदी हे संविधानावरती आलेलं प्रश्नचिन्ह आहे. गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही कार्य संविधानाला धरून चाललेल नाही. या देशातील न्यायालय निवडणूक आयोग या देशातील संसद यांना संविधानाने दिलेले हक्क अधिकार मोदींच्या राज्यात उध्वस्त झालेले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. निवडणूक आयोग राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करत आहे हे संविधानाला धरून नाही असे संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्यासारख्या लोकांनी संविधानावर बोलू नये तो संविधानाचा अपमान ठरेल. मोदी यांनी संविधान मजबुतीसाठी कुठलं कार्य त्यांनी केलं. या देशात विरोधी पक्ष राहून नये विरोधी पक्ष टाचेखाली असावा सेंट्रल एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या मागे चौकशीचा ससे मीरा लावून त्यांना तुरुंगात विद्यमान मुखमंत्र्यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या संविधान कलमात लिहिलेल आहे. भाजप दुध के धुले आहेत का? तपास यंत्रणा कधी भाजपवाल्यांच्या घरी गेले आहेत का? 70 हजारांचा सिंचन घोटाळ्यांवर मोदींनी आरोप केला. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे हे कोणत्या संविधानात लिहले आहे असे संजय राऊत म्हणाले.

ज्या पद्धतीने या सरकारने आमदार फोडले, त्यांना अपात्र केलं पाहिजे पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नाही. चंद्रचूड यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे. मोदी ज्या पद्धतीने हा देश चालवता आहेत ते संविधान विरोधी आहे. मोदी यांनी संविधान उधवस्त केले आहे. मध्यप्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याचा राग ठेवून त्यांच्यावर ईडीने कार्यवाही केली त्यांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली हे संविधानाला धरून आहे का? अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

गेल्या अनेक वर्षांमध्ये असत्य बोलणारे हे महान प्रधानमंत्री आहेत. असत्याचा विजय करण्याचे काम होते करण्यात आली. मोदींचा संविधान करता गौतम अडाणी आहे. 370 कलम हटवले उपकार केले का? काश्मीरमध्ये काय दिवे लावले आजही जवानांच्या हत्या होत आहेत, आजही काश्मीरमधील तरुण बेरोजगार आहे, सैन्याच्या ताकतीवर राज्य सुरू आहे. काश्मीरचा विषय संपला आहे. मनिपुरला जाऊन दाखवा असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

गौतम अदाणी यांना सांगा मनिपुरमध्ये एखादी प्रॉपर्टी घेऊन दाखवा. 1975 साली आणीबाणी उघडपणे इंदिरा गांधी यांनी आणली ती काय लपवून आणली नाही. तेव्हा अनेकांना तुरुंगात जावे लागले. प्रियांका गांधी यांनी सांगितले तुम्ही आणिबाणीपासून धडा घ्या. इंदिरा गांधींनी बॅलेट पेपरवर निवडणुका लढविण्याची हिंमत दाखविली पराभव पत्करला. अख्खा देश ओरडतो आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या मोदींची हिम्मत आहे का? नवीन संविधान अदानीसाठी लिहित आहे त्यांच्या फायद्या साठी सर्वात पहिले अजित पवार यांना पार्टीतून काढा. मोदी जे बोलतात ते करत नाही आणि जे करायचे असते ते त्यांच्याकडून होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT