Sanjay Raut: २०२९ पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का? एक देश एक निवडणुकीवरून राऊतांचा टोला

Sanjay Raut On PM Narendra Modi: संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. वन नेशन, वन इलेक्शनवरुन संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautyandex
Published On

२०२९ पर्यंत मोदी पंतप्रधान राहणार का? हा माझा प्रश्न आहे. नरेंद्र मोदीच्या लोकशाही, स्वतंत्र्य पूर्णपणे मोडून उद्धवस्त करण्याचा ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये वन नेशन, वन इलेक्शन ही त्यांची संकल्पना आहे. या देशामध्ये संघराज्यपद्धती आहे. प्रत्येक राज्याची सामाजिक त्यानंतर तिथले वातावरण प्रत्येक ठिकाणाचे वेगळे आहे. देशातील व्यवस्था उद्धवस्त करण्याचा मोदींचा डाव आहे. वन नेशन, वन इलेक्शनवरुन संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.

राज्यातल्या प्रश्न वेगळे राष्ट्रीय प्रश्न वेगळे त्यानुसार विचारपूर्वक मतदान करायचं असतं. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आतापर्यंत घेऊ शकलेला नाहीत. कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटत होती. हे बिल तुम्ही आणलेलं आहेत कॅबिनेटमध्ये मंजूरही केलात, पण मी जबाबदारीने बोलतो २०२९ला वन नेशन वन इलेक्शन हा फंडा असताना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का असा मला प्रश्न आहे. त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर हल्ला केला आहे इतिहासाने त्यांना माफ केलेले नाही.

Sanjay Raut
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी अपडेट, खोटी माहिती देत असाल तर सावधान...

जे पुढे नेत आहेत अशा योजना ते राजकारणात राहिलेले नाहीत. निवडणुका कधीही लागू द्या शिवसेनेने महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी चालू केलेली आहे. साडेतीन वर्ष या निवडणुका रखडाऊन ठेवल्या मुंबईला महापौर दिला नाही कारण त्यांना हरण्याचे भीती होते. वामा मार्गाने आम्ही विजय प्राप्त करू शकतो आणि त्या खात्री त्यांना पडली आहे. मुंबईत मराठी माणूस राहावा मुंबई मराठी माणसाची राजधानी राहावी यासाठी आम्ही प्राणाची बाजी लावून लढणार आहोत असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार आणि शरद पवार भेट

अजित पवार बरोबर जाणार आणि भाजप सोबत जाणार हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ मी रोजच असतो त्यांच्यासोबत संसदेत राज्यसभेत त्यांचा आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे. कुणीतरी फार ठरवून हे जागावाटप केलेलं आहे. धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाणपासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न केला अशा पासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही. या संदर्भात गौतम आदाणी मध्यस्थी करत आहे. त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करतात. हे गौतम आदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य घडवणार आहेत.

Sanjay Raut
Kolhapur: धक्कादायक! पावणेदोन लाखांची लाच घेताना वकिलाला अटक

ते दादा धर्मधिकारी आहेत का? विनोबा भावे आहेत का? ते यशवंतराव चव्हाण आहेत का? एक उद्योगपती नरेंद्र मोदींचा मित्र आहे. तो महाराष्ट्रात राजकारण करणार महाराष्ट्राचा भवितव्य ठरविणार आणि हे मुंड्या खाली घालून बसत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजेत स्वतःला मराठी म्हणून घ्यायला. अजित पवार गटाला मंत्रिपद यासाठी नाही की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितल आहे की पवार साहेबांचे पाच खासदार फोडून या तेव्हा तुमचा कोटा पूर्ण होईल आणि नंतर मंत्रिपद मिळेल.

Sanjay Raut
Kangana Ranaut: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी कंगना रणौतचे मोठे वक्तव्य, पुरुषांनाच केलं टार्गेट

शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आताही लोक फोडत आहेत फुटणाऱ्याला शरम वाटले पाहिजे. मी जे हे पाप केलं असतं तर माझ्यामध्ये हिम्मत नसते बाळासाहेब यांच्या नजरेला नजर मिळविण्याची. मला वाटत नाही ते नोटरीचेबल असतील सर्व खासदार शरद पवारांच्या बंगल्यावर होते. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नाहीत तर महाराष्ट्राची बेईमानी करतील. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न असेल ही दुधारी तलवार आहे. या राज्यात जे हुकूमशहा तयार झाले त्यांचा अंत फार वाईट झालेला आहे असेही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

महाविकास आघाडी अस्वस्थता

त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांच्याकडे पोलीस सीबीआय इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे दावे ते करू शकतात. या यंत्रणा आमच्याकडे असते तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता. बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा. निवडणुकांचे मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून जातील. आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडलं आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका. मुंबईसाठी 105 हुतात्मा द्यायची तयारी उद्धव साहेबांची आहे. पाहिला हुतात्मा तेव्हा मी असेल.

Sanjay Raut
Jammu Kashmir Weather : भारताच्या नंदनवनात हिमवृष्ठी, जम्मू काश्मीरचा पारा मायनस एक, प्रशासनाकडून अलर्ट

महापालिका निवडणूक

आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत. आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो आम्ही जो निर्णय घेऊ तो निर्णय घेताना माननीय उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र बसून घेऊन असे राऊत महापालिका निवडणुकीवर म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार

काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका नाही मिळाला म्हणजे झालं ,रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत. शिंदे यांच्या नाराजीला कोण विचारतं. त्यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सर्व कळसूत्री बाहुली आहेत. हे सर्व गुलाम आहेत गुलामाना बंडाची भाषा शोभत नाही ,त्यांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे पण ते डरपोक लोक आहेत.

राहुल गांधी भारत जोडो यात्रा

आम्ही आरजक पसरविणारे लोक नाही. अमोल पालेकर अनेक अधिकारी, वकील, डॉक्टर लोक भारत जोडो यात्रात होते. अभ्यास करा रिसर्च करा फडणवीस तुम्ही इव्हिएममधून बनलेले मुख्यमंत्री आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com