Jammu Kashmir Weather : भारताच्या नंदनवनात हिमवृष्ठी, जम्मू काश्मीरचा पारा मायनस एक, प्रशासनाकडून अलर्ट

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मैदानी भागात पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्याने हवामानाचा मूड बदलला आहे. खोऱ्यातील अनेक भागात बर्फवृष्टी झाल्याने किमान तापमानात सुधारणा झाली आहे.
jammu kashmir
jammu kashmiryandex
Published On

जम्मू-काश्मीरमध्ये या हिवाळ्यातील पहिली बर्फवृष्टी सुरू झाली आहे. बुधवारी, १३ डिसेंबर रोजी, राज्यातील प्रमुख पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा प्रारंभ झाला. यामुळे राज्यात हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी उंच भागात सुरू झालेली हिमवृष्टी गुरुवारी दुपारनंतरही अनेक ठिकाणी सुरूच होती.

हवामान विभागाने काश्मीर आणि जम्मूच्या काही भागांमध्ये तीव्र हिमपात आणि कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या मते, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीची तीव्रता वाढू शकते. तसेच, या वृष्टीमुळे धुंद आणि हिमाच्छादित रस्ते बनू शकतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढू शकते. हवामान केंद्र, श्रीनगरच्या मते, लमार्ग, पटनीटॉप, श्रीनगर, आणि गुलमर्ग या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर मध्यम हिमवृष्टी झाली.

jammu kashmir
Mumbai Air Pollution: नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईच्या हवेची गुणवत्ता आणखी बिघडली, कुलाबा आणि कांदिवलीची हवा अधिक धोकादायक

जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये पहाटे दोन मिनिटे बर्फवृष्टीची हलकीशी झलक पाहायला मिळाली. गुलमर्गसह खोऱ्यातील वरच्या भागात सहा ते दहा इंच बर्फ साचला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये थोड्या हिमवृष्टीनंतर २० डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील तापमान सामान्यपेक्षा कमी आहे.

jammu kashmir
Thane Water Supply: ठाण्यात पाणीबाणी; शुक्रवारी काही भागांत पाणीपुरवठा बंद, दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पुरवठा

२० डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, जम्मू विभागात रात्रीच्या तापमानात घट होईल, थंडी वाढेल. गुरुवारी जम्मूचे कमाल तापमान १९.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बनिहालचे कमाल तापमान ११.४, किमान तापमान ३.९ अंश सेल्सिअस होते.

jammu kashmir
Christmas Party:  ख्रिसमस पार्टीला घरच्याघरी तयार करा 'हे' स्नॅक्स, मुलं देखील आवडीने खातील...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com