Sharad Pawar and Chhagan Bhujbal  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भुजबळांनी पवारांची साथ सोडली, आता कर्माची फळं भोगत आहेत, मंत्रिपदावरून राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut On Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. भुजबळ आणि रवि राणा यांचा उल्लेख करत बोचरी टीका केली.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut News : छगन भुजबळ यांना मंत्रिपदामधून वगळण्यात जातीय राजकारण आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. आपापल्या कर्माची फळ भोगत आहेत, असा खोचक टोला राऊतांनी लगावला. झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीस यांनी राज्यात राबवला तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल, असे संजय राऊत म्हणाले.

विधानभनात आमचे विरोधी आमदार कमी आहेत, पण ते दमदार आहेत. आज पाहिला दिवस आहे. काही लोकांचे भिंतीवर टांगलेले कोट टाईट झाले. रवी राणा यांचं देखील मंत्रिपदासाठी नाव ऐकलं. ते देखील अमरावतीला गेले. जे आमच्याकडून गेले ते सत्ता, पद आणि पैशासाठी गेले हे स्पष्ट झालं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

देशाचं संविधान हे असत्य पुस्तक नाही. देशाचं संविधान हा देशाचा आत्मा आहे. पण त्यावर हल्ला करणारी लोक आहेत. जर ४०० पार झाले असते तर संविधान का बदलू नये यावर चर्चा झाली असती, असे संजय राऊत म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थाबाबत राज्यात प्रश्न आहेत. आज परभणी बंद हाक दिली आहे. संविधानाच्या पुस्तकावर जो हल्ला झाला, तो वाचवण्यासाठी तो रस्त्यावर आला होता. त्याच्या मृत्यूची जबाबदारी फडणवीस यांची आहे. आंबेडकरी जनता नाराज आहे, पण त्यांनी शांततेत आंदोलन करावं, असे संजय राऊत म्हणाले.

हे बिनखात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे कोणती खाती आहेत, ते ते सांगू शकत नाहीत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे का? हे त्यांना माहीत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबत तर सगळी बोंब आहे. ४० जणांनी काल शपथ घेतली. अधिवेशन सुरू आहे. कोणी कोणत्या खात्याची उत्तर द्यायची याची माहिती नाही, की सगळी उत्तरं फडणवीस देणार आहेत, असा टोला संजय राऊतांनी महायुतीला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT