Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

Shreya Maskar

सिंधुदुर्ग - मालवण

निवती किल्ला (किल्ले निवती) हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणपासून दक्षिणेस सुमारे १० किमी आणि वेंगुर्ल्यापासून १५ किमी अंतरावर वसलेला आहे.

Sindhudurg - Malvan | google

निवती किल्ला

निवती गावाजवळील एका टेकडीवर वसलेला हा ऐतिहासिक सागरी किल्ला अरबी समुद्र आणि लगतच्या निवती बीचच्या सुंदर सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Nivati ​​Fort | google

किल्ला कोणी बांधला?

कारली खाडी आणि वेंगुर्ला बंदराच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये मराठा साम्राज्याचा एक सागरी गड म्हणून निवती किल्ल्याची उभारणी केली होती.

Who built the fort? | google

किल्ल्याचा आकार

निवती किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. हा सागरी किल्ला ५० मीटर उंच टेकडीवर वसलेला असून, त्याच्याभोवती ६.१ मीटर (२० फूट) रुंद आणि ३.०५ मीटर (१० फूट) खोल संरक्षणात्मक खंदक आहे.

Shape of the fort | google

कसं जाल?

निवती किल्ल्यावर जाण्यासाठी कुडाळ रेल्वे स्थानक सर्वात जवळचे आहे. स्टेशनपासून निवती गावापर्यंत तुम्ही रिक्षाने प्रवास करा.

How to get there? | google

ऐतिहासिक किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भोगवे समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित असलेला हा ऐतिहासिक किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे.

Historic Fort | google

किल्ल्याचे वैशिष्ट्ये

आपले नौदल सामर्थ्य अधिक बळकट करण्यासाठी, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीनंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये निवती किल्ला उभारला.

Features of the fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Ahilyanagar Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...