Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात पावसाची उघडीप, आषाढी वारी अपडेट, एकनाथ शिंदे आणि अमित शहा भेटीचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update:
Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
Published On

आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

आषाढी वारीपूर्वी पंढरपूर शहरात बुधवारी रात्री आठच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, पावसाच्या सरींमध्ये मंदिराच्या शिखरावर पडणाऱ्या पावसाचे मनमोहक दृश्य पाहून भाविक भारावून गेले. आषाढी वारीपूर्वीच वरुणराजाने पंढरीत जणू जलाभिषेक केल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.

बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

उंडवडी येथील मुक्काम पूर्ण करून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी बारामती शहरात दाखल झाला. शहरातील शारदा प्रांगण येथे पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. यावेळी वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले. समाज आरतीचा कार्यक्रमही पार पडला. या प्रसंगी दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या हस्ते समाज आरती करण्यात आली. मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेसाठी २११.०६ कोटी रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला. यात इंटेक वेल, पंप हाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, सौरऊर्जा व्यवस्था आणि नवीन जलवितरण यंत्रणा उभारली जाणार आहे. हा प्रकल्प १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे उल्हासनगरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम करूनही अर्धाच पगार दिला जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुलगुरू कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. लेबर अॅक्टनुसार वेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रोजंदारी कामगार उपस्थित होते. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तातडीने पगारवाढ करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

बीडच्या केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात, शहरातील रस्ते जलमय

बीडच्या केज शहरासह परिसरात गेल्या दोन तासांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसाने केज शहरातील रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

भावली धबधबा पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरण, ९ आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सर्व ९ आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, इगतपुरी न्यायालयाने सुनावली १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

न्यायालयाच्या आवारात आरोपींचे नातेवाईकही मोठ्या संख्येने होते उपस्थित

पोलिसाच्या समोरून घेऊन गेला चोरटा दुचाकी, घटना सीसीटीव्हीत कैद

वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरी गेल्याची घटना समोर आलीय...विशेष म्हणजे चोरटा दुचाकी घेऊन जात असतांना एक पोलीस कर्मचारी समोर येताच चोराटा काही वेळ थांबतो.मात्र पोलीस गेल्यानंतर लगेच दुचाकी घेऊन पसार होतो. या संपूर्ण घटनेचा सिसिटीव्ही समोर आलाय...भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणावरून अगदी पोलिसांच्या समोरून दुचाकी चोरी होत असल्यानं कायद्याचा धाक राहिला नसल्याचं दिसून येतंय....

अतिक्रमणाच्या कारवाईसाठी माजी सैनिकाचा पंचायत समितीत आत्मदहनाचा प्रयत्न

तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात माजी सैनिक श्रीकांत गाटे यांनी काटी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेनंतर गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेव यांनी संबंधितांना १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी साठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले

नियमानुसार पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला

पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी

पुणे पासपोर्ट कार्यालयाला बॉम्ब ने उडवून देण्याचा मेल

पाषाण भागात असलेल्या पासपोर्ट कार्यालयाला मेल

बाँब शोधक नाशक पथकाकडून कार्यालयाची पाहणी

सायनाईड, पॉइसन बॉम्ब ने कार्यालय उडवून देण्याचे मेल मध्ये नमूद

तमिळ भाषेचा सुद्धा मेल मध्ये उल्लेख

बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द

नियमबाह्य कारभार आणि रक्तचोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मुंबईतील जे.जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं अखेर रद्द केला. या संपूर्ण प्रकरणात बदलापूर येथील माया ब्लड सेंटरचं कनेक्शन समोर आलं होतं. तपासणी न करताच तब्बल 50 रक्तपिशव्या बदलापूरला पाठवल्याचं उघड झाल्यानंतर बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलाय.

संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

सोमेश्वर नगर

संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला. या रिंगण सोहळ्याचे ड्रोन दृश्य अक्षय निंबाळकर यांनी टिपले आहेत.

सौजन्य अक्षय निंबाळकर ड्रोन रिंगण सोहळा सोपान काका पालखी

विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने राऊत पिता पुत्रांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला.

अटकेपासून पिता पुत्रांना कुठलाही दिलासा नाही.

कुठलाही शेती पोलीस विनायक राऊत आणि गितेश राऊत यांना अटक करू शकतात

इगतपुरी पर्यटक मारहाण प्रकरण, सर्व नऊ आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

टंचाई काळातही कोथिंबीरीने दिली शेतकऱ्याला साथ, अवघ्या 40 दिवसात मिळविला भरघोस नफा....

आधीच टंचाईग्रस्त नाशिक जिल्ह्याचा पूर्व भागात यंदा पावसाळा तब्बल दीड उशिराने सुरू झाला. अश्या प्रतिकूल परिस्थितीतही चांदवडच्या रायपूर येथील प्रयोगशील शेतकरी शंकर कोल्हे यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून टप्याटप्याने सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर कोथिंबीरिची लागवड केली. प्रसंगी स्प्रिंगलर व ठिंबक सिंचनाने पाणी देऊन कोथिंबीर जागविली. त्यांनी लागवड केलेल्या क्षेत्रापैकी 20 गुंठे क्षेत्रावरील काढणीला आलेल्या कोथिंबीर पिकाला अवघा दहा हजार रुपये खर्च करून केवळ 40 दिवसात 75 हजार रुपयांचा भरघोस नफा कमविला.कमी पाण्यातही योग्य नियोजन केले तरी शेतीतून चांगला नफा कमविता हे कोल्हे यांनी दाखवून दिले आहे. यंदा पावसाळा लांबला आहे. पुढेही पाऊस काय करेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यात व अल्प कालावधीचे पिके घेण्यावर भर देण्याचा सल्लाही कोल्हे यांनी दिला.

रायगडमध्ये मान्सुन पुन्हा सक्रिय

० आठ दिवसांपासून पावसाने मारली होती दडी

० 6 जुलैदरम्यान झालेल्या अतीवृष्टीपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे

० सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर दुपारी जोरदार पावसाची हजेरी

० संपूर्ण रायगडमध्ये सुरु आहे ऊन पावसाचा खेळ

जमिनीच्या किरकोळ वादातून माण मध्ये शाळेत टोळक्याकाढून तोडफोड करून जाळपोळ 

माण येथे कोथरूड येथील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल चालवण्यात येते या शाळेत पाचवी ते 10 पर्यंत वर्ग असून बारा शिक्षक व तीन शिपाई कार्यरत आहेत. मात्र शाळेच्या जागेवरून जय शिवराय प्रतिष्ठान आणि आरोपी गणेश पारखी यांच्या मागील काही पाळापासून वाद सुरू आहे. या प्रकरणात शाळेचे लिपिक बाळासाहेब लक्ष्मण माने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार गणेश ज्ञानोबा पारखी याला त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी या प्रकरणात बेअटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

नदीपात्र कोरडे पडल्याने रोशनगाव मध्ये तीव्र पाणीटंचाई 

बाभळी बंधाऱ्याचे गेट उघडल्यामुळे गोदावरी नदीपात्र कोरडे पडले आहे. गोदावरीचे नदीपात्र कोरडे पडल्याने धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीय.पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी रोशनगावच्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला.

अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या अडचणीत आहेत. अतिवृष्टीमुळे वेताळे येथील ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने एसटी सेवा बंद झाली असून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करणार- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करणार

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या अनेक योजना

मराठवाड्यात दुष्काळ भासणार नाही

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

- योग्य मोबदला आणि रिंगरोडचा मार्ग बदलावा, शेतकऱ्यांची प्रमुख आहे मागणी

- सुमारे ६५ किमी रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया आहे सुरू

- काही गावांतील शेतकऱ्यांचा कमी भाव मिळत असल्याने भूसंपादनाला आहे तीव्र विरोध

- गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू

- काही दिवसांपूर्वी अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली होती मात्र तोडगा नाही

- बैठकीनंतरही समाधानकारक तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांच आंदोलनाचा पवित्रा

- आजपासून आंदोलकांनी आमरण उपोषणाच उपसले हत्यार

- जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही आंदोलकांची भूमिका

ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

सोलापुरातील नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी महापालिकेचा दंडात्मक बडगा

पालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर केली कारवाई

'माय सोलापूर' अॅपवरील तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी 21 कर्मचाऱ्यांना एकूण 4 हजार रुपयांचा दंड.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज प्रलंबित ठेवल्याबद्दल 23 अधिकारी-कर्मचाऱ्यांना 25 हजार 900 रुपयांचा दंड

मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी; नादुरुस्त ट्रकमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकच्या चांदवड येथील रेणुका देवी मंदिरासमोरील चांदवड घाटात सध्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे या कामामुळे या ठिकाणी एकतर्फी वाहतूक सुरू असतानाच एक ट्रक अचानक नादुरुस्त झाल्याने क्रेनच्या साह्याने ना दुरुस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूला गेल्या एक ते दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे

नागपुरात होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू

- शिवसेना खासदार संजय राऊत सलग तीन दिवस नागपुरात असणार ठिय्या मांडून.

- रामरक्षा पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहावेत, यासाठी संजय राऊत यांची आटापिटा सुरू

- विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू.

वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

काम करूनही गेल्या दीड महिन्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांना पगार नाही 900 कर्मचारी रस्त्यावर

काम बंद आंदोलनामुळे जळगाव शहराची आरोग्य यंत्रणा विस्कळीत

जळगाव घातक रसायनांमुळे तोंडापूर धरणाच्या काठी 2 दिवसात मृत मासे

तोंडापूरसह परिसरात टाकलेल्या घातक रसायनांचा एक महिन्यांपासून राज्यभर गाजत असलेल्या जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी, वन विभागाच्या राखीव वन क्षेत्र, धरण, नदी, नाले या लगत 1200 हून अधिक घातक रसायने भरलेले, जमिनीत सांडलेले, रसायने जाळून प्रचंड वायू प्रदूषण निर्माण होणे, 30 ट्रक हून अधिक घातक रसायनांची संयुगे असलेली पावडर इ. निसर्ग व समाज विघातक बाबी टाकल्याने निसर्गाची अपरिमित हानी झाल्याचे शासनास व समाजास निदर्शनास आले आहे. दोन दिवसापासून अजिंठा डोंगरास अगदी लागून असलेल्या खडकी नदीवरील मध्यम प्रकल्पात मासे या रसायनांमुळे मृत होऊन धरणाच्या चार ही बाजूस पडलेले वन्यजीव संवर्धक तोंडापूर यांना आढळून आले.

पंढरपूरात पैशाची मागणी करत हल्ला; हल्ल्यात गाडीची तोडफोड

अजनसोंड येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने शासकीय वाळू ठेका सुरू आहे. हा ठेका चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी तुषार उर्फ बालाजी नागटिळक आणि त्यांच्या साथीदारांनी याने मागितली होती. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात भरून त्याने व त्याच्या साथीदाराने बबन सोपान माने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.

कॉम्रेड सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील आमरण उपोषणाला कोल्हापुरातून पाठिंबा

कॉम्रेड सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील आमरण उपोषणाला कोल्हापुरातून पाठिंबा

महाविकास आघाडीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी धरण आंदोलन करत दिला पाठिंबा

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत खासदार नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत खासदार नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले..

जनतेचे पैसे असेच वाया घालवायचे का?

अधीका-यांना काम करायचे नाहीत का ? नारायण राणेंचा सवाल

काम करायचे नसेल तर मी सोडणार नाही अधीक-यांची मग नोकरी गेली तरी मग बोलायच नाही

उद्धव ठाकरे यांची रामनगर येथील राम मंदिरासमोरील रस्त्यावर सभा

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रामनगर येथील राम मंदिरासमोरील रस्त्यावर सभा घेणार.

- सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेना महानगरप्रमुख किशोर कुमारिया आज अंबाझरी पोलिसांकडे अधिकृत पत्र देणार.

- काल खासदार संजय राऊत यांनी रामनगर येथील राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले तसेच मंदिर विश्वस्तांची भेट घेतली.

सर्वधर्मसमभावाचा संदेश देत संत महमंदखान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल

हाराष्ट्राची वारकरी परंपरा ही केवळ विठ्ठल भक्तीचीच नव्हे, तर सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य आणि मानवतेची शिकवण देणारी परंपरा म्हणून ओळखली जाते.

याच परंपरेचे जिवंत उदाहरण असलेली अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथील मुस्लिम संत महमंदखान महाराजांची दिंडी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली.

एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

- वडाळ्यातील केबीएच शाळेत शासकीय कामात अडथळा

- मतदार पुनरीक्षण मोहिमेत अर्ज वाटप करताना घडला प्रकार

- ११२ वर कॉल करताच पोलिस घटनास्थळी दाखल

- इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित मायलेकीविरुद्ध गुन्हा दाखल

- शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

Buldhana : पावसाभावी नुकतीच उगवलेली पिके सुकू लागलीत

नुकतीच उगवलेली पिके पावसाभावी सुकू लागलीत.

आठवडाभरात पाऊस बरसला नाही तर दुबार पेरणीचे संकट.

बुलढाण्यात पुन्हा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

Hingoli : बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

राज्यातील पहिला प्रस्ताव कलेक्टर हिंगोलीतून सरकारला पाठवणार

Palghar : पालघर जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई

पालघर जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

​बोईसर येथील 'प्रिन्स बार'मधील घरफोडीचा तपास करताना पोलिसांनी एकूण ३ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.

​या प्रकरणी रोहित विश्वकर्मा नावाच्या १८ वर्षीय आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री आरोग्य रथाच्या माध्यमातून आजारी वारकऱ्यांना मोफत गोळ्या आणि औषधाचे वाटप

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये शासनाच्या वतीने मुख्यमंत्री आरोग्य रथाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री आरोग्य रस्त्याच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती केली जात असून त्यामध्ये आजार तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या आणि औषधाचे वाटप केले जात आहे

ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात माऊलींची पालखी वाल्हेतून लोणंदकडे मार्गस्थ

टाळ-मृदुंगाचा गजर, अभंगांचा निनाद आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात लाखो वारकरी भक्तिभावाने माऊलींसोबत पायी मार्गक्रमण करत आहेत.

पहाटे धार्मिक विधी आणि आरतीनंतर माऊलींच्या पालखीने वाल्हेतून पुढील प्रवासाला सुरुवात केली.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून पुष्पवृष्टी आणि दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे.

सिल्लोड तालुक्यातील चिंचखेड येथे पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास टोमॅटोने भरलेल्या बोलेरो पिकअप आणि भुसार माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Nagpur: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर -

- पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक.

- खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अंबादास दानवे बैठकीला मार्गदर्शन करणार.

- शिवसेना फुटीनंतर संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने बैठकीत रणनीती ठरवली जाणार.

- उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाच्या' तयारीचा आढावा घेतला जाणार.

Ahilyanagar: हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर -

- हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापले

- बेग टोळीवर गंभीर आरोप... सागर बेग यांचे आमदार ओगलेंना प्रतिआव्हान

- तर मयत आकाश दुबय्या यांच्या वडिलांनी केली पोलिस संरक्षणाची मागणी -

Dharashiv: आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, जिल्हाभर काढण्यात येणार मोर्चा

धाराशिव -

आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, जिल्हाभर काढण्यात येणार मोर्चा

तुळजापूर मध्ये मातंग समाजाच्या विविध संघटनांच्या बैठकीत महामोर्चा काढण्याचा घेण्यात आला निर्णय

आपल्या चुली बंद ठेवून लाखोंच्या संख्येने मातंग समाज मोर्चात सहभागी होणार असल्याची संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

17 जुलै लोहारा,24 जुलै रोजी उमरगा तहसील कार्यालयावर तर 5 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा मोर्चा धडकनार

Dharashiv: दूध भेसळविरोधात कारवाई सुरू झाल्यापासून धाराशिवमध्ये दूध टंचाई

धाराशिव -

दूध भेसळ विरोधात कारवाई सुरू झाल्यापासून धाराशिवमध्ये दूध टंचाई

दूध विक्री करणाऱ्या अनेक छोटी मोठे दुकान बंद, दूध ग्राहकाने सांगितला अनुभव

थेट शेतातून दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडे गर्दी वाढली

गेल्या काही दिवसात दूध खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली, अगोदर पेक्षा दूध विक्रीला आता कमी वेळ लागतो; दूध विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने सांगितला अनुभव

Satara: सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स

सातारा -

सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स

सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप माडवे यांना पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणी आयोगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना समन्स बजावून २५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवालही आयोगासमोर सादर करावा लागणार आहे.

Navi Mumbai: पनवेल जेएनपीटी मार्गावर कारवर गर्डर कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

नवी मुंबई -

पनवेल जेएनपीटी मार्गावर कारवर गर्डर कोसळला

उड्डाणपूलाचे काम सुरू असताना कोसळला गर्डर

सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी नाही

मोठी दुर्घटना टळली

जेएनपीटी वरून पनवेल येथे जाणाऱ्या मार्गीकेवरून जात असताना कार वर हा गार्डर कोसळला आहे.

Nagpur: चीनच्या परिवहन उपमंत्र्यांनी केली नागपूर मेट्रो रेल्वेच्या तंत्रज्ञानाची पाहणी

नागपूर -

- चीनच्या परिवहन उपमंत्र्यांनी केली नागपूर मेट्रो रेल्वेच्या तंत्रज्ञानाची पाहणी

- चीन येथील परिवहन मंत्रालय, राष्ट्रीय रेल्वे प्रशासन आणि सीआरसी नानजिंग पुझेन येथील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नागपूर मेट्रो आणि हिंगणा डेपोला दिली भेट..

- चीनच्या परिवहन मंत्रालयाचे उपमंत्री वांग गांग यांनी या शिष्टमंडळाचे केले नेतृत्व..

- या दौऱ्यात आलेल्या शिष्टमंडळाने हिंगणा डेपो ची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील संचालन नियंत्रण प्रणाली,रोलिंग स्टॉक देखभाल आणि अत्याधुनिक कार्यशाळेची माहिती घेतली..

- नागपूर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी शिष्टमंडळाला सादरीकरणाद्वारे नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्ये उत्कृष्ट नियोजन अध्यात्मिक तंत्रज्ञान,रेल्वे संचालन,पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती दिली.

Nagpur:  शिवसेनेच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेसने 'राम भक्त आस्था जागरण यात्रा

नागपूर -

- शिवसेनेच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेसने 'राम भक्त आस्था जागरण यात्रा

- १९ जुलै ला रामटेक येथील गड मंदिरातून यात्रेला प्रारंभ होणार आहे.

- हम नहीं भूले प्रभु के प्रण को, कब न्याय मिलेगा जन-गण को... चाहें जान हमारी जाये, चंदा चोर ना बचने पाये" असा घोषवाक्य काँग्रेसने दिला आहे.

- यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम तसेच झुणका-भाकर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

- रामटेक–मनसर–कन्हान–कामठी असा यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

Pune: आदिवासी विभागात खासगी क्लास चालकाच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी समिती नेमताच आयुक्तांची बदली

पुणे -

आदिवासी विभागात खासगी क्लास चालकाच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी समिती नेमताच आयुक्तांची बदली

टेंडर घोटाळ्याच्या तपासासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आयुब डॉक्टर मंजिरी मनोलळकर यांनी नेमली होती समिती

समिती नेमताचा सहा दिवसात मनोळकर यांची बदली करून त्यांच्या ठिकाणी श्रीधर दुबे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

आदिवासी प्रशिक्षण संस्थेत परीक्षा पूर्व प्रशिक्षण योज

Nashik: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

नाशिक -

- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

- मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी वृक्षतोडीविरोधात केली होती याचिका

- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महतांसाठी साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनातील काही वृक्ष तोडण्यासंदर्भात झाला होता निर्णय, याच निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलीय याचिका

- आज सुनावणी दरम्यान काय निर्णय होतो, याकडे नाशिककरांचं लक्ष

Pune News: पुण्यातील सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड, टोळक्याने माजवली दहशत

पुणे -

पुण्यातील सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड

सोसायटीत घुसून टोळक्याने माजवली दहशत

गाड्यांची तोडफोड करत स्थानिकांना धमकवल्याचा प्रकार

सहकारनगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीतील घटना

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Raigad: मुंबई- गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली

रायगड -

- मुंबई- गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली

- रायगडच्या पोलादपूर जवळील धामणदिवी गावा हद्दीत दरड कोसळल्याची घटना

- दरड कोसळल्याने कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक ठप्प

- मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू

- पोलिस, महसुल, आपत्ती व्यवस्थापन विभाग घटना स्थळी दाखल

- दरड घटण्याचे काम सुरु

Yavatmal: बाभुळगांव पोलिसात बुरस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल

यवतमाळ -

यवतमाळमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी

साम टिव्हीचा यवतमाळमध्ये मोठा इम्पॅक्ट

बाभुळगांव पोलिसात बुरस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल

बनावट व निकृष्ट दर्जाचा सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी बाभुळगांव पोलिसात कंपनीवर गुन्हा दाखल

बाभुळगांव तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com