अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

हेल्दी आणि टेस्टी नाश्ता

नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी म्हणून लोक आवडीने इडली खातात. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच इडली हा पदार्थ आवडतो.

Oats Idli Recipe

ओट्स इडली

अनेक फिटनेसप्रेमी इडली खातात. यासाठी आज आम्ही तु्म्ही ओट्स इडली रेसिपी सांगणार आहोत. ओट्स इडली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Oats Idli Recipe

साहित्य

ओट्स इडली बनवण्यासाठी ओट्स, बारीक रवा, दही, साखर, गाजर, मटार, कांदा, इनो, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Oats Idli Recipe

ओट्स परतून घ्या

इडली बनवण्यासाठी सर्वातआधी गॅसवर पॅनमध्ये ओट्स परतून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये ओट्स थंड करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करा.

Oats Fry

फोडणी द्या

त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, उडीद डाळ, चना डाळ परतून घ्या. त्यात रवा मिक्स करून खमंग भाजून झाल्यावर त्यामध्ये ओट्स पावडर घाला आणि चांगले परतून घ्या.

Fodni

भाज्या मिक्स करा

नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात कांदा, कोथिंबीर, गाजराचा किस, मटार मिक्स करा. नंतर त्यात दही, मीठ व साखर घालून मिक्स करा व पाणी टाकून बॅटर तयार होईल.

Oats Idli

इडली वाफवून घ्या

मिश्रणात इनो घालून फेटून घ्या. त्यांनंतर इडलीच्या भांड्यात मिश्रण टाकून इडली वाफवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी ओट्स इडली तयार होईल

Oats Idli

NEXT: लाडक्या लेकीसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 सुंदर डिझाईन्स

येथे क्लिक करा...