Maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस घरात का ठेवला?', रामदास कदमांच्या प्रश्नांवर खासदाराची चपराक

Sanjay Raut Hits Back at Ramdas Kadam: रामदास कदमांमी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत "रामदास भरोशाचा माणूस नव्हता" असा थेट हल्लाबोल करत टिका केली.

Bhagyashree Kamble

  • रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.

  • संजय राऊतांचं प्रत्युत्तर.

  • 'रामदास भरोशाचा माणूस नव्हता'.

  • संजय राऊतांचा कदमांवर हल्लाबोल.

शिंदे सेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. दोन दिवस बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्यांच्या हाताचाही ठसे घेण्यात आले होते, असा गंभीर आरोप कदमांनी केला. या आरोपांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 'रामदास कदम कधीच भरोशाचा माणूस नव्हता', असं संजय राऊत म्हणाले.

रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, 'रामदास कधीच भरोशाचा माणूस नव्हता. उद्धव ठाकरे यांनी २ वेळा त्यांना विधान परिषद दिली. पक्षात अनेकांचा विरोध असतानाही ठाकरेंनी त्यांना संधी दिली. खरंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायाशी नतमस्तक व्हायलं हवं होतं. पण त्यांनी उलट वागणूक दिली', असं राऊत म्हणाले.

'नीलम गोऱ्हे आणि रामदास कदम या दोघांना विरोध होता. गोऱ्हे यांचे योगदान काय? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 'बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीत बोलत आहात. याची जबर किंमत मोजावी लागेल', असंही राऊत म्हणाले.

'बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर आम्ही सगळे तिथे होतो. रामदास कदम तिथे नव्हते. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या स्तराला जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. बाळासाहेब यांची विटंबना केली जात आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत, ते कधीच बाळासाहेब याच्यांशी एकनिष्ठ राहू शकत नाही. त्यांना दैवत मानू शकत नाही', असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shipi Amti Recipe : कर्जतची स्पेशल झणझणीत शिपी आमटी; भाताची चव वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

हृदयद्रावक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील ९ महिन्याचे बाळ चाकाखाली, मुंबईतील मन हेलावणारा VIDEO

Dowry Harassment: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'ची आत्महत्या; हुंडाबळीचा फास कधी सुटणार?

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंगनं गाणं सोडलं नाही, रिटायरमेंटनंतरही आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना लावणार याड

SCROLL FOR NEXT