Raj Thackeray- Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut Vs Raj Thackeray: 'विधानसभेच्या २५० जागा लढणार', राज ठाकरेंची घोषणा, संजय राऊतांचा सणसणीत टोला; म्हणाले...

Sanjay Raut Vs Raj Thackeray Maharashtra Political Update: काही दिवसापूर्वी त्यांना महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिनशर्ट पाठिंबा म्हणजे उघडा पाठिंबा दिला," असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचे त्यांनी सांगितलं.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. २६ जुलै २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेचे रणशिंग फुंकले. मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्तेत असणार असा विश्वासही व्यक्त केला. मनसे अध्यक्षांच्या या दाव्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना खणखणीत टोला लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. बराच काळ ते परदेशात होते. त्याच्यामुळे राज्यामध्ये काय चाललं आहे हे त्यांना समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांना महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिनशर्ट पाठिंबा म्हणजे उघडा पाठिंबा दिला," असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचे त्यांनी सांगितलं.

"ज्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असं म्हणाले होते. त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला, यातचं सगळं आलं. आता महिन्यात भूमिका बदलली अन् २८८ जागा लढणार आहेत म्हणजे आश्चर्य आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठीच राज्यातल्या स्वाभिमानी पक्षांना ही पाऊले उचलले जात आहेत का? काही पक्ष, संघटना, व्यक्ती महाराष्ट्राच्या विरुद्ध भूमिका घेण्यासाठीच जन्मले आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नावे तर एक मोठा यश मिळवला आहे हे पक्ष टिकल्याचा लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचे लक्षण आहे आणि लोकांना भरभरून मत देणे याचा लक्षण आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी लाडकी बहिण योजनेवरुन केलेल्या टीकेवरुन राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

SCROLL FOR NEXT