Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का, विदर्भातील बडा नेता आज शिवबंधन बांधणार; उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार!

BJP Leader Ramesh Kuthe Will Join Thackeray Group Today: आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विदर्भात भाजपला मोठा धक्का बसत आहे. विदर्भातील बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय.
भाजपला मोठा धक्का
Ramesh Kuthe Will Join Thackeray Group Saam Tv
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे. विदर्भामध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विदर्भातील भाजपचा एक बडा नेता शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. आता कुथे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार आहे.

विदर्भातील बडा नेता आज शिवबंधन बांधणार

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार (Maharashtra Politics) आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश होणार आहे. रमेश कुथे यांनी २०२८ साली शिवसेना (ठाकरे गट) सोडली होती, आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपला मोठा धक्का

आज पुन्हा रमेश कुथे यांची घरवापसी होत असल्याचं समोर आलंय. १९९५ आणि १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर (BJP Leader Ramesh Kuthe Will Join Thackeray Group) होते. तर २०१८ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक महायुतीतील नेत्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपला मोठा धक्का
Sanjay Raut: 'मोदी फक्त दोघांनाच घाबरतात, शेतकरी अन् ठाकरे...' नाशिकच्या महासभेत राऊतांची फटकेबाजी

उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार

गेल्या काही दिवसांपासून रमेश कुंथे (Gondia) राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांणा पूर्णविराम मिळाला आहे. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार का? अशा चर्चांणा उधाण आलं होतं. मात्र त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घर वापसीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आज त्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा दुपारी बारा वाजता पार पडणार आहे. रमेश कुथे यांचा ठाकरे गटात प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात (Mumbai News) आहे.

भाजपला मोठा धक्का
Maharashtra Politics: शाब्दिक पोपटपंची करून थांबेल, ती शिवसेना नव्हे; ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com