शिवसेना फुटीनंतर राज्याचं राजकारण बदलून गेलं आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरु केला आहे. ठाकरे गटाच्या नाशिकमधील सभेत माजी मंत्री सुभाष देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 'शाब्दिक पोपटपंची करून थांबेल, ती शिवसेना नव्हे, अशा शब्दात सुभाष देसाईंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंनी नाशिकच्या सभेत उपस्थितांना संबोधित केले. सुभाष देसाई म्हणाले, ' उद्योग आपल्या राज्यात यावेत, म्हणून उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात देखील प्रयत्न केले. आम्ही रोजगार वाचवले. मी आणि आदित्य ठाकरे दावोसला गेलो. राज्यातील गुंतवणूक वाढवली. आता काय होतंय? राज्यातले उद्योग गुजरातला जात आहेत. आम्ही तुमचं ओरबाडून घेत नाही, पण आमचं लुबाडून का नेत आहेत. पण शिंदे सरकार गप्प बसलं आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'केंद्र सरकार उद्योगपतींचे गुलाम झालं आहे. सरकारच्या नव्या कामगार कायद्यामुळे लाखो कामगार बेरोजगार होतील. कामगार कपात केली जात आहे. या कायद्याचा निषेध. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे कामगार कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, असं ठणकावून सांगितलं. आता या सरकारकडून काय अपेक्षा करणार. महाराष्ट्रात भरती घोटाळा झाला. खासगी कंपन्यांना कंत्राट दिल्यानं भरती घोटाळा झाला आहे. आम्ही यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोय, असं देसाई म्हणाले.
'अयोध्येतील राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, हा आमचा श्रध्देचा विषय आहे. शाब्दिक पोपटपंची करून थांबेल ती शिवसेना नव्हे. बाळासाहेब ठाकरेंनी अयोध्येत मंदिर झालं पाहिजे, अशी गर्जना केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिक अयोध्येला कार सेवेसाठी गेले. शिवसैनिक फक्त भजन कीर्तन करण्यासाठी गेले नाही. माझ्यासह कारसेवक अयोध्येला गेले. बाबरी पडली म्हणून मंदिर झालं, बाबरी पडली तेव्हा भाजपने घुमजाव केलं, असं सुभाष देसाई म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.