Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: शाखेवर बुलडोजर फिरवला त्याचा हिशेब घेतला जाईल...; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Sanjay Raut News: ११ तारखेला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई येथील शाखेला भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Ruchika Jadhav

Mumbra News:

मुंब्रामधील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ११ तारखेला उद्धव ठाकरे मुंब्रा्यातील शाखेला भेट देणार आहेत. त्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात शाखेवरून सुरू असलेला वाद आणखी चिघळणार अशी चिन्हे दिसतायत. खासदार संजय राऊतांनी देखील या मुद्द्यावरून शिंदे गटावर ट्वीटरवरून निशाणा साधला आहे.

२ नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ताबा मिळवला. त्यानंतर २००१ पासून मुंब्रा कौसा या ठिकाणी सुरू असलेल्या याच मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस आणि शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाकडून या शाखेचा मागील २२ वर्षांपासून टॅक्स भरला जात आहे. अशाप्रकारे या शाखेवर बुलडोजर फिरवणे चुकीचे असून ही शाखा जमीनदोस्त करू नये, यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करावा., असं पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस बघ्याची भूमिका घेतल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय.

त्यामुळे मुंब्रा येथील शाखेवर बुलडोजर फिरून जे पाप केलंय त्याचा हिशोब होईल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. ११ तारखेला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई येथील शाखेला भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

"हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे. त्यावर बुलडोजर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोजर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा हिशोब होईल. हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. ११ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत. तुमच्या बुलडोजर पेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्वाचे..हिशोब होईल!११ नोव्हेंबर मुंब्रा शाखा. जय महाराष्ट्र", असं ट्वीट संजय राऊतांनी केलंय.

ज्या ठिकाणी ही शाखा जमीनदोस्त करण्यात आली काल त्याच ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून या शाखेच्या पुनर्बांधणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. या शाखेमध्ये कुठलीही समाजपोयोगी कामे होत नव्हती स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेचा उपयोग केला जात होता आणि त्यामुळेच या शाखेवर आम्ही ताबा मिळवला असून येथे समाजासाठी कामे केली जातील असं शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुक्ताईनगरातील उमेदवारांना 'झेड प्लस' सुरक्षा द्या: एकनाथ खडसे

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT