नाशिकमधील फरार लाचखोर अभियंता गणेश वाघविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ५ दिवसांनंतरही गणेश वाघ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडेना. त्यामुळेच गणेश वाघला शोधण्यासाठी देशभरात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
अहमदनगरच्या बहुचर्चित एक कोटीच्या लाच प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला एमआयडीसी धुळ्याचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ पाच दिवसांनंतरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी देशभरात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आलीय.
तसेच आणखी तीन पथके संशयित ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. ३ नोव्हेंबरला नगर एमआयडीसीजवळ बायपास रस्त्यावर एक कोटीची लाच घेताना सहायक अभियंता अमित गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. यामध्ये गणेश वाघ मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं होतं.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. मात्र गायकवाडला अटक झाल्याचं कळताच गणेश वाघ फरार झाला होता. त्यामुळे नव्याने तीन पथके वाघ शोधासाठी गेली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.