Sanjay Raut PC SaamTv
महाराष्ट्र

Sanjay Raut On BJP: भाजप राजकीय स्वार्थासाठी औरंगजेबाला पुन्हा पुन्हा का जिवंत करतेय? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut Press Conference: 'हिंमत असेल तर दंगलखोर शोधा',असे संजय राऊत यांनी सांगितले.

Priya More

Chhatrapati Sambhaji Nagar News: कोल्हापूरमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनावरुन (Kolhapur Protest) ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपसोबतच महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'भाजप राजकीय स्वार्थासाठी औरंगजेबाला का जिवंत करत आहे', असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. त्याचसोबत, 'हिंमत असेल तर दंगलखोर शोधा', असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'कर्नाटकात बजरंगबली चालले नाहीत. शेवटी यांना औरंगजेब, टिपू सुलताना, बहादूरशहा यांना शरण जावे लागले. यांचं हिंदुत्व इतकं कमजोर आहे की त्यांना मोगलाईची प्रतीकं राजकारणासाठी वापरावी लागत आहेत. महाराष्ट्राने संभाजीनगरमध्ये औरंगजेबाला गाडले. अशा औरंगजेबाला आम्ही कबरीमध्ये गाडल्यानंतर देखील भाजपं राजकीय स्वार्थासाठी या औरंगजेबाला पुन्हा पुन्हा का जीवंत करत आहे. याचं उत्तर राज्याच्या प्रमुखांनी आणि उपप्रमुखांनी द्यायला हवं.'

'दंगली कोण करतं ते शोधा. कोल्हापूरमध्ये जी लोकं रस्त्यावर उतरले होते. त्यातली 60 टक्के लोकं बाहेरची होती. संगमनेरला तेच झाले. जिथे जिथे हिंदुत्वाच्या नावाने मोर्चे काढत आहे ते सर्व बाहेरची लोकं गोळा करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या काळात औरंगजेब जीवंत झाले नाही. तुमच्या काळात वर्षभरात औरंगजेब कबरीतून का बाहेर येत आहे. दंगली विरोधीपक्ष कधीही घडवत नाही.', असे संजय राऊत यांनी सांगितले.

'देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांना हे शोभत नाही. हे औरंगजेब तुमच्या अवतीभोवती निर्माण झाले आहेत. तुम्ही त्यांना ताकद देत आहे. देवेंद्र फडणवीस इतिहासात नोंद राहिल. तुमच्या सरकारमध्ये कमजोर गृहमुख्यमंत्री असल्याने महाराष्ट्र कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीत मागे पडला. हिंमत असेल तर दंगलखोर शोधा. या राज्यातील कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. तुमचं गृहखातं फेल ठरले आहे.', अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. तसंच मुंबई आणि ठाण्यात घडलेल्या घटनेंवरुन देखील त्यांनी सरकारला धारेवर धरले.

'तुम्ही कायदा आणि पोलीस यंत्रणा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी वापरत आहेत. तुमचे समर्थक भ्रष्टाचारी आहेत त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा वापरत आहेत. भविष्यात निवडणूका जिंकण्यासाठी विरोधकांना कसा त्रास देता येली यासाठी यंत्रणांचा वापर केला जात आहे.', अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. 'विरोधकांच्या बाबतीत आधी माफी मग चौकशी. तर स्वत:च्या बाबतीत चौकशी नाही, एफआयआर नाही, तक्रार नाही. गुंडांचे समर्थन ही या राज्याची स्थिती आहे.', अशी देखील टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT