Sandeep Deshpande News: औरंगजेबाचा पुतळा जाळणं भोवलं; मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल

MNS Sandeep Deshpande News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
Sandeep Deshpande News
Sandeep Deshpande NewsSaam TV

MNS Sandeep Deshpande News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात बेकायदा जमाव गोळा करून औरंगजेबचा पुतळा जाळण्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून मोठा वाद उफाळला. या संपूर्ण प्रकाराचा निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी (७ जून) आंदोलन केले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला.

Sandeep Deshpande News
Pune Crime News: पुण्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी नेलं, सैफवर गुन्हा दाखल

दरम्यान, बेकायदा गर्दी जमवून आंदोलन केल्याप्रकरणी तसेच शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात औरंगजेबाचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस ऍक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता

कोल्हापुरात (Kolhapur) औरंगजेबाच्या स्टेटसवरून बुधवारी चांगलाच वाद पेटला. कोल्हापूर बंदला अचानक हिंसक वळण लागलं. निदर्शनं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेथून विविध भागांमध्ये पांगले आणि शहरात १३ ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाले.

Sandeep Deshpande News
Political News: नुसती ट्विटरवरून टीका करून कामं होत नाहीत; खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे आमदार राजू पाटलांवर टीका

दरम्यान, संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. भाऊसिंगजी रोडवर अश्रुधुराचा वापर करून दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगविण्यात आलं. या घटनेत दोन तरुण आणि पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तूर्त शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, हिंसक वळण लागलेल्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com