संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन आता ‘डीबीटी’द्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी ‘केवायसी’ असणे महत्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. परंतु ज्यांचे बँक खात्याशी ‘केवायसी’ झालेले नाही, त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे.
आपण जर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही पेन्शन पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करावा लागेल. जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं कराल तर तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्या बँक खात्यावर केवायसी अपडेट न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची अडचण होणार आहे.
ज्यांचे ‘केवायसी’ होऊ शकत नाही, त्यांचे काय करायचे ? याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान येाजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत. यातील लाभार्थ्यांना महिन्याला १५०० रुपये पेन्शन मिळत आहे. हे पैसे सरकारकडून तहसिलदारांना पाठविले जातात.
त्यानंतर ते याचे बिल हे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या खात्याकडे पाठवितात. या ठिकाणी ते मंजूर झाल्यावर पुन्हा तहसिलदारांना दिले जातात. त्यानंतर त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते. त्यानंतर संबंधित लाभर्थ्यांकडून बँकेत जाऊन ही रक्कम काढली जाते. परंतु सरकारने आता पेन्शनची ही रक्कम ‘डीबीटी’ द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सध्या या योजनेतील लाभार्थ्यांची आधार कार्डची पडताळणी करुन त्यांची ‘डीबीटी’ पोर्टलवर नोंद करण्याची प्रक्रिया युध्द पातळीवर सुरु आहे. यामध्ये आधारकार्डचे बँक खात्याशी केवायसी केले जात आहे. परंतु अद्याप अनेक लाभार्थ्यांचे केवायसी झालेले नाही. तसेच यातील अनेक जणांचे तांत्रिक कारणांमुळे आधार पडताळणी होऊन केवायसी होणे शक्य ही नाही.
अशा लाभार्थ्यांबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश शासन निर्णयामध्ये नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत तरी या लाभार्थ्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने काही तरी पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात ९२ टक्के ‘डीबीटी’चे काम पूर्ण
‘डीबीटी’ पोर्टलवर जिल्ह्यात ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील ६६ हजार ५०९ लाभार्थ्यांची नोंदणी
श्रावणबाळ योजनेतील ६७ हजार ६७० लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन ‘डीबीटी’द्वारे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. काही ज्येष्ठ नागरिकांची काही तांत्रिक अडचणींमुळे ‘डीबीटी’ पोर्टलवर नोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्यासाठी सरकारने काही तरी पर्यायी मार्ग काढणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.