सांगलीत सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याने तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला! SaamTVNews
महाराष्ट्र

खळबळजनक : सांगलीत सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याने तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला!

योगेश याने दीड महिन्यांपूर्वी भडकंबे आष्टा येथील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. मात्र, यांनतर दोन्ही बाजूच्या परिवारामध्ये जोरदार वाद सुरु झाला.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या (Sangli) मिरजेतील (Miraj) सुभाष नगर बारगाले प्लॉट याठिकाणी प्रेम विवाह केल्याच्या रागातून योगेश चंद्रकांत लवाटे वय 28 या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी सैराट (Sairat) सिनेमा सारखा हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जखमी योगेश याच्यावर मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश याने दीड महिन्यांपूर्वी भडकंबे आष्टायेथील तरुणीशी प्रेम विवाह केला होता.

हे देखील पहा :

दोन दिवसांपूर्वी दोन्ही कडील नातेवाईकांचा वाद झाला होता. सदरचा वाद मिरज (Miraj) पोलिसांत पोहचला. मात्र, पोलीस स्टेशनमध्येच (Police Station) मुलींच्या वडिलांनी योगेश याला धमकी दिली होती. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता मोटारसायकल वरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून पळ काढला.

यावेळी गंभीर जखमी योगेशला त्याच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत योगेशच्या काकू वैशाली लवाटे यांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या हल्ल्याने मिरजमध्ये खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT