धक्कादायक : शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या गावातील राजकीय वादातून! चौघांना अटक

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांची काल रात्री अज्ञात युवकांनी गोळ्या झाडून व नंतर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली.
Yavatmal Sunil Divare
Yavatmal Sunil Divare SaamTvNews
Published On

-- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे (Sunil Divare) यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळी झाडून व नंतर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेने यवतमाळमध्ये खळबळ माजली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनील डिवरे यांना उपचारांसाठी यवतमाळच्या (Yavatmal) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी सुनील यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले होते. (Yavatmal Shivsena Leader Sunil Divare Murder Latest News)

हे देखील पहा :

सुनील डिवरेंच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने शिवसैनिकांनी (Shivsainik) कालपासून एकच गर्दी केली आहे. दरम्यान सकाळ पासून भांब राजा जवळ नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग वर टायर झाळून रास्तारोको आंदोलन शिवसैनिकांनी सुरू केले. त्यामुळे अधिकचा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी पाचारण करण्यात आला आहे. आंदोलनकर्ते संतप्त झाल्याने पोलीसांचा ही नाईलाज झाला होता. हा रास्तारोको तब्बल तीन तास चालला त्यामुळे दोन्ही बाजुच्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) ह्यांनी आंदोलनकर्ते शिवसैनिकांची समजूत काढल्याने तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आला.


शिवसेना (Shivsena) पदाधिकारी सुनील डिवरे हे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक होते. तसेच भांब राजा या गावाचे ते माजी सरपंच देखील होते. त्यांच्या पत्नी अनुप्रिया डिवरे ह्या सध्या भांब राजा येथील सरपंच आहेत. शिवसैनिक म्हणून बाजार समिती संचालक सुनील डिवरे यांनी परिसरात चांगली पकड निर्माण केली होती. नुकतीच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भांब राजा परिसरात राजकीय समीकरण त्यांच्या शिवाय पूर्ण होणार नव्हते.

Yavatmal Sunil Divare
धक्कादायक : डॉ.सुवर्णा वाजे यांच्या खुनाचे गूढ उकलले; पतीनेच केली हत्या!

या हत्याकांडा मागे हेही एक कारण महत्त्वाचे मानले जात आहे. सुनील डिवरे यांची परिसरात कडवट शिवसैनिक म्हणून ओळख होती व स्थानिक राजकारणावर (politics) त्यांची मोठी पकड होती. त्यामुळे विरोधकांना सुनील त्यांच्या राजकीय मार्गातील काटा ठरत असावा म्हणूनच त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याने यवतमाळ शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com