धक्कादायक : डॉ.सुवर्णा वाजे यांच्या खुनाचे गूढ उकलले; पतीनेच केली हत्या!

थंड डोक्याने हत्या करून मुंबई-आग्रा महामार्गावर डॉ.सुवर्णा वाजे यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह ठेवून गाडी जाळण्यात आली.
Suvarna Waje Murder Case
Suvarna Waje Murder CaseSaamTvNews
Published On

नाशिक : गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडतोच. नाशिकमधील (Nashik) घटनेनं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उकललं असून सुवर्णा वाजे (Suvarna waje) यांच्या पतीनेचं त्यांचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. (Dr.Suvarna Waje Murder Latest News)

हे देखील पहा :

किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीला संपवणाऱ्या पतीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक महापालिकेत डॉक्टर असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून त्यांच्याचं पतीने केल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे अतिशय थंड डोक्याने प्लॅनिंग करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि गुन्हा लपवण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर त्यांच्याचं गाडीत त्यांचा मृतदेह ठेवून गाडी जाळण्यात आली. 26 जानेवारीला जळालेल्या गाडीत एका स्त्रीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर याचं गूढ उकलण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र अवघ्या 8 दिवसांत पोलिसांनी तपास करून खऱ्या खुन्याला अटक केलीय..

घटनाक्रम :

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे या २५ जानेवारी रोजी मोरवाडी हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या. रात्री कामावरून त्या निघाल्याही होत्या. दरम्यान, वाडीवाऱ्हे पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रायगड नगर जवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनामध्ये पूर्णत: जळालेल्या अवस्थेत सांगाडाआढळून आला होता.

रात्री उशीर झाल्याने पती संदीप वाजे यांनी नातेवाइकांकडे विचारपूस केली. परंतु त्या न परतल्याने त्यांनी मध्यरात्री अंबड पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

जळालेली कार ही वाजे यांचीच असल्याचे चेसीज नंबरच्या मदतीने पोलिसांनी स्पष्ट केले. डॉ. वाजे यांचे वाहन आढळलेल्या ठिकाणापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले जात होते.

सिडकाेतील स्टेट बँक व अन्य वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्हींसह वाडीवऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून डॉ. सुवर्णा यांच्या मोबाईलच्या लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते.

डॉ. सुवर्णा वाजे आणि त्यांचे पती संदीप वाजे यांच्यात सातत्याने भांडणं व्हायची. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात याआधीही तक्रारी दाखल होत्या. याचं भांडणातून पती संदीप वाजेनं सुवर्णा वाजे यांना संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे या कटामध्ये त्यांचे आणखी काही साथीदारही सहभागी असल्याचं समोर आलंय. मात्र त्यांची नावं पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही. मात्र खुनाचा संपूर्ण घटनाक्रम समजावून घेण्यासाठी पोलीस आता या सर्व घटनाक्रमाचं रिकन्स्ट्रक्शन करणार आहेत. मात्र या घटनेमुळे पती-पत्नीच्या नात्यालाही काळिमा फासली गेलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com